Home Maharashtra चिमूर विधानसभा मतदारसंघाच्या युवक अध्यक्ष पदी श्री.प्रशांत डवल यांची नियुक्ती.‌ —...

चिमूर विधानसभा मतदारसंघाच्या युवक अध्यक्ष पदी श्री.प्रशांत डवल यांची नियुक्ती.‌ — राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या बळकटीसाठी देणार योगदान…

शुभम गजभिये

  विशेष प्रतिनिधी

       चंद्रपूर जिल्हा ग्रामीण युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनु धोटे यांनी,श्री.प्रशांत डवले यांची राष्ट्रीय काँग्रेस पक्षातंर्गत चिमूर विधानसभा मतदारसंघाचे युवक अध्यक्ष म्हणून दिनांक : 27/03/2026 रोज शनिवारला नियुक्ती केली आहे.

         नियुक्ती पत्रात म्हटले आहे की,भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार मल्लिकार्जुन खरगे यांना अभिप्रेत असलेली पक्ष संघटना बांधणी मजबूत करण्याच्या दृष्टीने,काँग्रेस विधिमंडळ पक्षनेता माजी विरोधी पक्ष नेते व आमदार विजय वडेट्टीवार यांच्या मान्यतेने आणि पक्ष श्रेष्ठींच्या संमतीने,चंद्रपूर जिल्हा (ग्रामीण) युवक काँग्रेस कमिटी तर्फे जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे,आपली चिमूर विधानसभा युवक काँग्रेसच्या अध्यक्ष पदी नियुक्ती करीत आहे.

         आपल्याला जाणीव आहे की,अखिल भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय प्रभारी मनीष शर्माजी,भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानुजी,महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रभारी अजय चीकारा जी,महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष शिवराज मोरे व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते,हे विद्यमान भाजप सरकारच्या जातीय व धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या धोरणांवर तसेच सर्वसामान्य जनतेला भेडसावणाऱ्या महागाई आणि भ्रष्टाचार यासारख्या गंभीर विषयावर जागरुकता निर्माण करण्यासाठी दिवसरात्र झटत आहेत.

        धर्मनिरपेक्ष आणि सर्वसमावेशक विकास देणारे कांग्रेस सरकार राज्यात व देशात आणण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत तसेच आपन सुद्धा पक्षाचे ध्येय धोरणे व कार्यक्रम राबवीतांना समाजातील प्रत्येक घटकात न्याय देऊन पक्ष मजबूत करण्यासाठी आपण प्रामाणीक प्रयत्न कराल ही आपणास आशा बाळगतो.

        श्री.प्रशांत डवले यांना नवीन जबाबदारी बाबत चंद्रपूर जिल्हाध्यक्ष ग्रामीण युवक श्री.शंतनु धोटे यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले व पुढील वाटचालिस खूप खूप शुभेच्छा दिल्यात..

          श्री.शंतनु धोटे यांनी श्री.प्रशांत डवले यांच्या नियुक्तीचे पत्र माहिती करीता,विजय वडेट्टीवार,आमदार ब्रम्हपुरी विधानसभा,श्री.सुभाष धोटे जिल्हाध्यक्ष,चंद्रपूर जिल्हा कॉग्रेस कमिटी,नवजोत सिंह सिद्धू,प्रभारी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस,शिवराज मोरे प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेस,अनुराग भोयर,प्रभारी चंद्रपूर जिल्हा (ग्रामीण) युवक कॉंग्रेस यांना पाठविले आहे.