शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
चंद्रपूर जिल्हा अंतर्गत चिमूर तालुक्यातील मौजा हरणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक क्षेत्रात ऐतिहासिक कामगिरी केली आहे.
सन २०२५-२६ च्या प्रवेश प्रक्रियेत शाळेतील,१) कुमारी अवनी अविनाश रणदिवे,२) कुमारी ऋतुजा दिनेश श्रीरामे,आणि कुमार प्रियांशू साईनाथ रणदिवे या तीन विद्यार्थ्यांची ‘एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल’ (EMRS) साठी निवड झाली आहे.
शाळेच्या इतिहासामध्ये एकाच वेळी तीन विद्यार्थ्यांची या प्रतिष्ठेच्या विद्यालयासाठी निवड होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
यशाची भरारी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आपल्या जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर घेत हे यश संपादन केले आहे.
एकलव्य विद्यालयासाठी होणारी निवड ही अत्यंत कठीण मानली जाते,परंतु या विद्यार्थ्यांनी योग्य नियोजन आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली या परीक्षेला गवसणी घातली.या निवडीमुळे आता या विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे माध्यमिक शिक्षण आणि सोयीसुविधा उपलब्ध होणार आहेत.
शाळेचे आणि गावाचे नाव उज्ज्वल….
या दैदिप्यमान यशाबद्दल मुख्याध्यापक,सर्व शिक्षक वृंद आणि शालेय व्यवस्थापन समिती पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले आहे.
जिल्हा परिषद शाळेतील गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि विद्यार्थ्यांची मेहनत यामुळेच हे यश शक्य झाले असल्याचे शिक्षकांनी सांगितले.
कौतुकाचा वर्षाव….
अवनी,ऋतुजा आणि प्रियांशू यांच्या या यशामुळे हरणी गावात आनंदाचे वातावरण असून,सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
पालकांनीही आपल्या पाल्यांच्या या यशामुळे समाधान व्यक्त केले असून शाळेच्या शैक्षणिक दर्जाचे आभार मानले आहेत.
अभिनंदनाचा वर्षाव….
जि.प.प्राथमिक शाळा,हरणीच्या ३ विद्यार्थ्यांची ‘एकलव्य’ विद्यालयासाठी प्रथमच निवड झाल्याने,१) अवनी अविनाश रणदिवे,२) ऋतुजा दिनेश श्रीरामे,३) प्रियांशू साईनाथ रणदिवे या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांवर व मार्गदर्शक शिक्षकांवर सर्व स्तरातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.



