मागच्या पाच भागात लेखक इस्राएल /अमेरिका V/S इराण यांच्यातील युद्ध भडकून त्याचे परिणाम जर जागतिक अणूयुद्धात झालेच, तर त्याला हा जागतिक बुद्धीजीवी वर्गच जबाबदार असेल.यात सर्वसामान्य जनतेची कोणतीही चूक नसते. लेखकाच्या त्या मताला बऱ्याच जणांनी बुद्धीजीवी वर्ग जबाबदार असूच शकत नाही, असे मत मांडले.म्हणून त्यावर लेखकाचे स्पष्टीकरण….
कोणत्याही लोकशाही देशात न्यायाधीश / न्यायमूर्ती ही अशी व्यवस्था आहे की सर्वसामान्य अडाणी जनता जेंव्हा सर्वप्रकारच्या संकटात साडते, तेंव्हा देवा धाव रे,तूच आहेस रे बाबा… म्हणून धावा करते. याचा ढोबळ मानाने अर्थ काय?
तर याचा अर्थ एवढाच की सर्वसामान्य निरागस माणूस जेंव्हा कोणत्याही प्रकारच्या मोठ्या संकटात सापडते. त्याचा असा समज होतो की आता मला देवच काय तो वाचवू शकतो. कारण त्यानेच मला जन्माला घातले.त्यालाच माझी काळजी आहे.अशी स्वतःची समजूत काढून त्या देवाला आळवितो.ही सर्वसामान्य जनतेची निरागस आणि निर्मळ मानसिकता असते.
अगदी या देवाची श्रद्धा जेवढी या सर्वसामान्य जनतेत असते.तेवढीच किंबहुना त्यापेक्षा जास्त श्रद्धा या न्यायाधीश / न्यायमूर्ती असणाऱ्या गरिमावर असते.
कारण भारताच्या संविधानातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी अनुच्छेद क्रमांक 124 ते 147 यातून सर्वोच्चं न्यायालयाची आणि 214 ते 243 यातुन उच्च न्यायालयाची अनुच्छेदातून संविधानिक कर्तव्ये सांगितली आहेत.
त्या खुर्चीत बसणारा प्रत्येक व्यक्ती जेंव्हा न्यायदानासाठी बसतो,तेंव्हा त्याने दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून घेतो.दोन्ही पक्ष आपलीच बाजू सत्य असल्याचे पुराव्यानिशी पटवून देण्याचा 100% (कुटनीतीचा किंवा सदसदविवेक बुद्धीचा वापर करून ) प्रयत्न करत असतात.
परंतू,या पदावर बसणाऱ्या न्यायाधीश /न्यायमूर्तीने आपल्या हृदयातील सदसदविवेक बुद्धीच्या पटावर घासून, कोणत्याही कुटनीतीचा आधार न घेता,त्या घडलेल्या सत्यापर्यंत पोहचून दोषींना दंड संहितेनुसार शिक्षा देणे आणि निर्दोष व्यक्ती किंवा व्यक्तीसमूहाला न्याय देणे. हीच संविधानिक जबाबदारी पार पाडण्याचे महान कार्य या न्यायाधीश /न्यायमूर्तिना करावे लागते,नव्हे ते त्यांचे संविधानिक कर्तव्यच आहे.म्हणूनच सर्वसामान्य जनतेचा आजही न्यायव्यवस्थेवर विश्वास टिकून आहे.
परंतू “या देशातील न्यायालयीन व्यवस्थेतला खेळ जेंव्हा सर्वसामान्य जनतेला कळेल ना,तेंव्हा आपल्या देशात फ्रेंच राज्यक्रांती घडल्याशिवाय राहणार नाही.:- मार्कंडेय काटजू ( सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती )
त्याचप्रमाणे,12 जानेवारी 2018 रोजी सर्वोच्च न्यायालयातील चार न्यायमूर्तीनी न्या.चेलमेश्वर,न्या.रंजन गोगोई,न्या.मदन लोकूर आणि न्या.कुरियन जोसेफ यांनी तत्कालीन CJI न्या.दिपक मिश्रा यांच्यावर असलेली न्यायालयीन संविधानिक नाराजी नव्हे तर खदखद व्यक्त करण्यासाठी पत्रकार परिषद घेतली होती…
त्याचप्रमाणे,21 मार्च 2025 रोजी दिल्ली उच्चं न्यायालयाचे न्या.यशवंत वर्मा यांच्या निवास्थानाला आग लागल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात रोकड सापडली…
अशा कितीतरी घटना घडल्या,ज्या जनतेपर्यंत पोहोचल्या.परंतू यापेक्षा मोठ्या प्रमाणावर काही घटना घडून सुद्धा आमच्यापर्यंत पोहचू शकल्या नाहीत त्याचे काय?त्यांची संख्या तर अगणित आहे!…
काही आदर्श न्यायाधीश सुद्धा आहेत.मध्यप्रदेशातील एक जिल्हा न्यायाधीश न्या.लाहोटी यांनी तर लिहून दीले की माझे जेवढे वेतन असेल त्याच्या 25% मला वेतन मिळावे आणि मला निवृत्तीवेतन नको.असे लेखी लिहून दिले आहे.ते अविवाहित असून आपल्या आईची सेवा करत करत न्यायदानाचे महान कार्य करतात,”परंतू असे आदर्श विरळाच!..
बहुसंख्यांक मात्र यशवंत वर्मा प्रमाणेच.म्हणून आज सर्वसामान्य जनतेला न्यायालयातून न्याय न मिळता वाट पाहुन पाहुन केवळ निकाल मिळतो. हे वास्तव आहे.
म्हणूनच न्या.मार्कंडेय काटजू यांनी जे अप्रत्यक्षरित्या जनतेला सावध करण्यासाठी आपले मत मांडले. ते 100% वास्तव असणारच!
म्हणूनच जगातील इतर लोकशाहीवादी देशातील न्यायाधीश/ न्यायमूर्ती बुद्धीजीवी वर्ग आपल्या स्वार्थासाठी,अहंकाराला पोसल्यामुळे कुटनीतीचा वापरून हृदयातील सदसदविवेक बुद्धीला कायमचे मारून टाकल्याने सर्वसामान्य जनता न्यायापासून वंचित झाली.म्हणूनच ही जागतिक जनता आज जगता – जगता मरत आहे आणि मरता – मरता जगत आहे.
या अशा परिस्थिती मुळे जी जागतिक महायुद्धाची परिस्थिती निर्माण झाली आहे, आणि यातून जर जागतिक अणूयुद्ध घडलेच तर अप्रत्यक्षपणे हा न्यायाधीश/न्यायमूर्ती बुद्धीजीवी वर्गच कारणीभूत असेल..



