Home Political २७ मार्चला चिमूरात काँग्रेस कार्यकर्ता मेळावा व भव्य पक्षप्रवेश सोहळा…

२७ मार्चला चिमूरात काँग्रेस कार्यकर्ता मेळावा व भव्य पक्षप्रवेश सोहळा…

शुभम गजभिये

 विशेष प्रतिनिधी

    चिमूरात काँग्रेस कार्यकर्ता मेळावा होणार असून या मेळाव्यात भव्य पक्षप्रवेश सोहळा होणार असल्याची पत्रपरिषदेतून माहिती दिली गेली.

       या कार्यकर्त्यां मेळाव्याला माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार,आमदार अभिजित वंजारी,भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चंद्रपूर जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे,यांच्या प्रमुख उपस्थितीत चिमूर येथील शेतकरी भवनात उद्या दिनांक २७/३/२०२६ ला दूपारी १२ वाजता राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा व पक्ष प्रवेश सोहळा पार पडणार आहे.

        दरम्यान भव्य पक्षप्रवेश सोहळा यशस्वीरित्या संपन्न होणार असल्याची माहिती भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चिमूर तालुकाध्यक्ष विजय गावडे पाटील,काँग्रेसचे जेष्ठ नेते जुनेद खान,सेवादलाचे राम राऊत,काँग्रेसचे जेष्ठ नेते किशोर शिंगरे,युवक काँग्रेसचे अध्यक्ष नागेंद्र चट्टे,सचिन गाडीवार,मधूकर मुंगले,संजय घुटके आदीं पदाधिकाऱ्यांनी दिली.

        सदर पक्ष कार्यकर्ता सोहळा व भव्य पक्षप्रवेश सोहळा यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कामाला लागले आहेत.