शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
पळसगांव :- अमेरिका-इज्राईल व ईराण या देशांमध्ये सुरु असलेल्या युद्धाचे पडसाद आता महाराष्ट्रातही उमटू लागले आहेत.चिमूर तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक घरच्या ठिकाणी गॅस पुरवठ्यावर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.
अनेक ग्रामीण भागाच्या ठिकाणी गॅस सिलेंडर टंचाई निर्माण झाल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो आहे.चिमूर तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना त्रास होत आहे.

गॅस सिलेंडरचा पुरवठा नेमका कधी होणार याबाबत माहिती मिळावी अशी मागणी गॅस सिलेंडर ग्राहकांकडून होत आहे.गॅस सिलेंडर साठी गर्दी होत असल्याचे चित्र सध्या ग्रामीण भागामध्ये पाहायला मिळत आहे.
यामुळे चिमूर तालुक्यात गॅस सिलेंडरचा प्रचंड प्रमाणात तुटवडा पडला असून,”कुणी गॅस सिलेंडर देता का सिलेंडर!,असी म्हणण्याची वेळ गॅस ग्राहकांवर आली आहे.
गॅस सिलेंडर बुकिंग कालावधी वाढवणे,बुकिंग करताना लाईन व्यस्त दाखवणे,यामुळे चिमूर तालुक्यातील एच.पी.गॅस ग्राहक पुरते परेसान झाले आहेत.

बॉक्स…
स्वयंपाक कसा करायचा हा यक्ष प्रश्न चिमूर तालुक्यातील गॅस सिलेंडर ग्राहकांना पडला आहे.
गॅस सिलेंडर च्या संकटामुळे ग्राहकांच्या रस्त्यावर लागलेल्या रांगा म्हणजे ग्राहक भोवळ येऊन पडण्याची शक्यता आहे किंवा एखाद्या ग्राहकाला जिव गमावण्याची वेळ येवू शकते..
कोविड काळात औषधांची जशी उपाययोजना करण्यात आली होती,”तशाच प्रकारच्या अती तात्काळ उपाययोजना ग्राहकांना गॅस सिलेंडर पुरवठा करण्यासाठी केंद्र सरकारने व महाराष्ट्र सरकारने करावी अशी मागणी मौजा कोटगाव येथील जबाबदार गृहीणी सौ.सोनीया उपक्षम रामटेके यांनी केली आहे….



