प्रदीप रामटेके
मुख्य संपादक
पेसा क्षेत्रातंर्गत शेकडो कार्यरत कंत्राटी शिक्षकांच्या नियुक्त्या शासन निर्णयानुसार व धोरणानुसार गडचिरोली जिल्ह्यात करण्यात आल्या होत्या.शिक्षकांच्या नियुक्त्या झाल्यानंतर अत्यंय प्रतिकुल परिस्थितीचा सामना करीत पेसा क्षेत्रातंर्गत कंत्राटी शिक्षकांनी गडचिरोली जिल्ह्यातील,”जिल्हा परिषद शाळांचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी जिवाचे रान केले,बौद्धिक क्षमता पणाला लावली,प्रसंगी उपवासी राहिले,असुविधांना सामोरे गेले.
महाराष्ट्र सरकारच्या प्राथमिक शिक्षण विभागाने पेसा कार्यक्षेत्रातील कंत्राटी शिक्षकांना वेळेवर मानधन दिले नाही,परेशान केले,हतबल केले,तरीही सदर शिक्षकांनी स्वतःला सावरत शिक्षणाची दारे नियमित खुली ठेवली,अतोनात श्रम केलीत,विद्या दानाचे महत्त्व ग्रामीण भागात अधोरेखित केलीत.
अशा ध्येयवादी,ध्येयनिष्ठ शिक्षकांची शासन स्तरावरून अवहेलना करणे अमानवी कृतीची कार्यपद्धत असते.अशा कार्यपद्धतीचा अवलंब करणे म्हणजे गडचिरोली जिल्ह्यातंर्गत पेक्षा कार्यक्षेत्रातील शिक्षकांवर अन्याय करणे होय,त्यांच्या उज्ज्वल भविष्याची राखरांगोळी करणे होय.त्यांचे जिवन उध्दवस्त करणे होय.
यामुळे ज्या शिक्षकांना पेसा क्षेत्रातंर्गत कंत्राटी शिक्षक म्हणून नियुक्त केले त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही,त्यांची हेळसांड होणार नाही,याची जबाबदारी महाराष्ट्र राज्यातील प्राथमिक शालेय शिक्षण विभागाची आहे.
पेसा क्षेत्रातंर्गत ज्या कंत्राटी शिक्षकांनी बेहद्द प्रतिकुल परिस्थितीचा सामना करीत गडचिरोली जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांचे शिक्षण उत्तमरित्या सांभाळले,त्या शिक्षकांवर कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही,याबाबतची नैतिक जबाबदारी आता शालेय शिक्षण विभागाने स्विकार करणे अगत्याचे आहे.
म्हणूनच गडचिरोली जिल्हा अंतर्गत पेसा क्षेत्रातंर्गत प्राथमिक कंत्राटी शिक्षकांना सेवेत कायम करावे अशी उच्चीत मागणी निवेदनाद्वारे त्यांनी केली आहे व गडचिरोली जिल्हा परिषदे पुढे आंदोलनाला पेसा क्षेत्रातंर्गत कंत्राटी शिक्षकांनी सुरुवात केली आहे.
प्रश्न हा पडतो की,पेक्षा क्षेत्रात कंत्राटी शिक्षकांच्या नियुक्त्या केल्या नंतर त्यांच्याकडे महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण विभाग दुर्लक्ष का म्हणून करतय…
महत्वाचे…..
महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग,शासन निर्णय क्रमांक- बीसीसी-2023/प्र. क्र. 54/आरक्षण-5, दिनांक 11 फेब्रुवारी 2026.च्या संदर्भीय विषयाच्या अनुषंगाने जिल्हा परिषद गडचिरोली पेसा क्षेत्रांतर्गत कार्यरत कंत्राटी शिक्षक गडचिरोली जिल्ह्यात अतिदुर्गम,नक्षलग्रस्त मागास क्षेत्रात शिक्षकांची पदभरती झालेली नसल्याने शिक्षकांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त होत्या.
त्यामुळे जिल्हा परिषद गडचिरोली मार्फत महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार शैक्षणिक सत्र 2024-25 मध्ये TET/CTET व TAIT-2022 उत्तीर्ण पात्रता धारक उमेदवारांची पेसा क्षेत्राकरिता कंत्राटी शिक्षक म्हणून भरती केलेली होती.
मागील दोन वर्षापासून जिल्हा परिषद गडचिरोली द्वारा आदेशित पात्रता धारक कंत्राटी शिक्षक अति संवेदनशील,नक्षलग्रस्त आणि अति मागास क्षेत्रात तुटपुंज्या मानधनावर आणि सहा- सहा महिने मानधन न मिळाल्याने आर्थिक समस्येला सामोरे जाऊन सुद्धा कसल्याही प्रकारची हुजर – तक्रार न करता प्रामाणिकपणे कर्तव्य बजावत असताना नुकताच दिनांक 11 फेब्रुवारी 2026 च्या महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णयानुसार मा.सर्वोच्च न्यायालयाद्वारे पेसा क्षेत्रातील पदभरती संदर्भात याचीकांवर सूचना देण्यात आल्या व त्यानुसार महाराष्ट्रात पेसा क्षेत्रातील एकूण पदांपैकी 50 टक्के पदे ही पेसा क्षेत्रातील अनुसूचित जमातीस राखीव असून उर्वरित 50 टक्के पदे खुल्या प्रवर्गातून भरल्या जावीत असे उल्लेख आहेत.
परंतु या नवीन शिक्षकांच्या पदभरतीमुळे या क्षेत्रात आजतागायत ज्या कंत्राटी शिक्षकांनी उपासमार सोसून प्रामाणिकपणे सेवा बजावली त्यांच्यावर अन्याय होईल.

मा.सर्वोच्च न्यायालयाच्या पेसा क्षेत्रातील 50 टक्के खुल्या प्रवर्गातून भरतीच्या मान्यते नुसार जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत शिक्षक पदांच्या जागा पोर्टल वर न देता कार्यरत TET/CTET व TAIT 2022 पात्रता धारक कंत्राटी शिक्षकांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून कायम सेवेत सामावून घ्यावे व आम्हा सर्व कंत्राटी शिक्षकांना शिक्षण सेवक पदावर रुजू करून न्याय मिळवून द्यावा,अशी रास्त मागणी नजरेसमोर ठेवून दिनांक 16 मार्च 2026 रोज सोमवार पासून जिल्हा परिषद गडचिरोली येथे,”सर्व कंत्राटी शिक्षक बेमुदत धरणे आंदोलन,अत्यंत शांततेने तसेच कायदा व सुव्यवस्था यांचे पालन करून करण्यात येत आहे.
जिल्ह्यातील पेसा कंत्राटी शिक्षकांना “कायम करा,कायम करा… कंत्राटी शिक्षकांचा एकच नारा” अशा विविध घोषणा देत लढा तीव्र करण्यात आला असुन शासनाविरोधात ऐल्गार पुकारण्यात आला आहे.
सदर आंदोलनास बहुजन समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड,तद्वतच भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमोलभाऊ मारकवार,भारतीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत व शिक्षक भारतीचे पदाधिकारी यानी आंदोलनस्थळी भेट दिली व समस्या जाणून घेतल्या आणि शासनाचा तीव्र निषेध करीत आंदोलनास पाठिंबा जाहीर केला आहे.
सोबतच जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत पेसा क्षेत्रातील सर्व कंत्राटी शिक्षक बेमुदत धरणे आंदोलन स्वीकारीत असल्याबाबत ना. आशिष जैस्वाल सहपालकमंत्री गडचिरोली,ना.दादाजी भुसे शिक्षणमंत्री,ना.भोयर साहेब राज्यमंत्री,आमदार सुधिरभाऊ मुनगंटीवार,आमदार विजयभाऊ वडेट्टीवार,आमदार रामदास मसराम,आमदार डाॅ.मिलिंद नरोटे,सोबतच गडचिरोली जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले असुन बेमुदत कामबंद आंदोलनाची सुरवात करण्यात आली आहे.
सदर कामबंद आंदोलनात जिल्ह्यातील सरासरी साडेतीनशे च्या वर कंत्राटी शिक्षक-शिक्षिका यानी प्रत्यक्षदर्शी सहभाग घेतला असल्याचे दिसून येत आहे.
तरी वरील गंभीर बाब विचारात घेऊन शासनाने तातडीन लक्ष घालून न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या जिल्ह्यातील कंत्राटी शिक्षकांना योग्य तो न्याय द्यावा अशी रास्त व प्रामाणिक मागणी सदर बेमुदत कामबंद धरणे आंदोलनातून करण्यात आली आहे.



