Home Maharashtra आठवले समाजकार्य चिमूर शेडेगाव येथील क्षेत्रकार्य निरोप समारंभ उत्साहात संपन्न…   

आठवले समाजकार्य चिमूर शेडेगाव येथील क्षेत्रकार्य निरोप समारंभ उत्साहात संपन्न…   

      रामदास ठुसे 

नागपूर विभागीय प्रतिनिधी 

चिमूर :-

            आठवले समाजकार्य चिमूर येथील बी.एस.डब्ल्यू द्वितीय वर्षाच्या प्रशिक्षणार्थ्यांनी दिनांक १२/०३/२०२६ रोज गुरुवारला क्षेत्रकार्य निरोप समारंभ शेडेगाव समुदाय येथे आनंदी व भावनिक वातावरणात पार पाडला.

           या कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ.सुनीता वानखेडे मॅडम,अंगणवाडी सेविका शेडेगाव आ.क्र.१) होते. मार्गदर्शक प्रा. डॉ.खंगार सर यांनी समाजकार्यातील प्रामाणिक पण व जबाबदारी याबाबत सखोल मार्गदर्शन करीत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून शेडगाव येथील नगरसेविका सौ.भारती गोडे मॅडम यांनी प्रशिक्षणार्थ्यांनी क्षेत्र कार्य करत असताना केलेले कार्य आरोग्य,स्वच्छता,शिक्षण जनजागृती,आपुलकीने साधलेला संवाद, समुदायाशी निर्माण केलेली जवळीक व त्यांच्या कार्यामुळे समुदायात सकारात्मक बदल घडून येण्यास मदत झाली असे त्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले.

         विशेष अतिथी सौ.इंदिरा डांगे मॅडम (आशा वर्कर शेडगाव) यांनी प्रशिक्षणार्थ्यांनी केलेले क्षेत्रकार्य अत्यंत उपयुक्त ठरले व आमच्या समस्या जाणून घेतल्या आणि विविध सामाजिक विषयांवर मार्गदर्शन केले असे असे सांगितले. यावेळी सौ.पायल हजारे मॅडम ( अंगणवाडी सेविका शेडेगाव आ. क्र. २)सौ.छबूताई बारेकर मॅडम( अंगणवाडी मदतनीस शेडगाव आ. क्र. २)तसेच अंगणवाडी क्र.१ शेडेगाव व अंगणवाडी क्र. २ शेडेगाव येथील लाभार्थी तसेच आठवले समाजकार्य महाविद्यालय चिमूर येथील प्रशिक्षणार्थी. कु. पूजा नैताम, कु. अंजु दोडके, कु.प्रज्वल चौधरी,उपस्थित होते. प्रशिक्षणार्थीनी कु.कांचन निकोडे हिने आपले मनोगत व्यक्त केले.

          कार्यक्रमाच्या सूत्रसंचालन कु.प्रतीक्षा गायकवाड हिने सांभाळली. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व मान्यवरांनी शिक्षणार्थ्यांच्या यशासाठी आशीर्वाद दिला ज्यामुळे कार्यक्रमाची महती अधिक दृढ झाली.आभार प्रदर्शन प्रशिक्षणार्थी कु.नयन कोसरे याने केले.