Home Maharashtra ६० हजार रुपये,”अन,”वाळू भरलेला ट्रॅक्टर सोडलाय… — तो तलाठी कोण?,”चर्चेला फुटले...

६० हजार रुपये,”अन,”वाळू भरलेला ट्रॅक्टर सोडलाय… — तो तलाठी कोण?,”चर्चेला फुटले पेव….

प्रदीप रामटेके

  मुख्य संपादक

       जांभुळघाट मंडळ अधिकारी क्षेत्रातंर्गत अनेक नदीच्या घाटावरुन दररोज वाळूचे अवैध उत्खनन सुरू असून,सदर उत्खननाद्वारे भिसी,चिमूर,जांभुळघाट,नेरी विभागात वाळूचा मोठ्या प्रमाणात पुरवठा केला जातो आहे.

         मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा होत असताना जांभुळघाट मंडळ क्षेत्रातील तलाठी अवैध वाळू उत्खननाकडे दुर्लक्ष करतात असे दिसून येत आहे.

        १२ मार्च २०२६,रोज बुधवारला रात्रो एक ते दिड वाजताच्या दरम्यान वाळू भरलेला ट्रॅक्टर,जांभुळघाट येथे भिसीकडे जाणाऱ्या मार्गावर तलाठ्याद्वारे पकडण्यात आला होता.सदर तलाठ्यासोबत परत काही व्यक्ती असल्याची माहिती आहे.

          वाळू भरलेले ट्रॅक्टर पकडल्या नंतर ट्रॅक्टर मालकासी झालेल्या तडजोडी अंतर्गत ६० हजार रुपयांच्या लाचेद्वारे सदर वाळू भरलेले ट्रॅक्टर सोडण्यात आले असल्याच्या चर्चेला पेप फुटले असून जांभुळघाट परिसरातील नागरिकांत ६० हजार रुपयांच्या लाचेची चर्चा दबक्या आवाजात सुरु आहे.सदर ट्रक्टर मौजा कपर्ला येथील असल्याचीही चर्चा आहे. 

       मात्र,वाळू भरलेले ट्रॅक्टर अडवणारा व तडजोडी अंतर्गत ६० हजार रुपयांची लाच घेणारा तो तलाठी कोण? हा प्रश्न अजूनही गुलदस्त्यात आहे.

      याचबरोबर सदर ट्रॅक्टर कुणाचे आहे व ट्रॅक्टर मालक कुठला आहे,हे संबंधित तलाठ्यालाच माहिती असल्याची चर्चा खोटी नसावी,असे लोकचर्चा वरुन लक्षात येते आहे.