Home Maharashtra इराणसोबत संबंध तुटल्याचा फटका भारताला :- अँड.प्रकाश आंबेडकर 

इराणसोबत संबंध तुटल्याचा फटका भारताला :- अँड.प्रकाश आंबेडकर 

दिक्षा कऱ्हाडे 

वृत्त संपादिका 

       इराणसोबत भारताने मैत्रीपूर्ण संबंध कायम ठेवले असते तर चीनप्रमाणे भारतालाही ऊर्जा पुरवठ्यात मोठा फायदा झाला असता. 

        मात्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे भारताची विविध स्तरांवर नाकेबंदी होत असून त्याचा परिणाम अर्थव्यवस्था आणि बँकिंग व्यवस्थेवरही होऊ शकतो,अशी टीका अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

        ऊर्जा सुरक्षेचा प्रश्न हा केवळ अर्थव्यवस्थेपुरता मर्यादित नसून तो देशाच्या परराष्ट्र धोरणाशी आणि आर्थिक स्थैर्याशीही थेट जोडलेला आहे.