शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
प्रादेशिक सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता यांनी चिमूर तालुक्यातील तिन राज्य महामार्ग,राष्ट्रीय महामार्गासाठी प्रस्तावित केले आहेत.
यामध्ये चिमूर-शंकरपूर-कान्पा,नेरी-पेंढरी-नवरगाव-सिंदेवाही आणि नंदोरी-कोरा- खडसंगी,राज्य मार्गाचा समावेश करण्यात आला आहे.
प्रादेशिक विभागातील रस्त्यांचे राष्ट्रीय महामार्गात दर्जोन्नती करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यासंबंधाने अप्पर मुख्य सचिव सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे,” राष्ट्रीय महामार्गात दर्जोन्नती करण्यासाठी २०/०२/२०२६,ला संबंधित प्रादेशिक सार्वजनिक बांधकाम विभाग नागपूरचे मुख्य अभियंता यांना पत्र पाठविण्यात आले होते.
महाराष्ट्र शासन आबासाहेब पं.नागरगोजे सचिव (बांधकामे),क्र.संकीर्ण-२०२६/प्र.क्र. ४६/राम-१,सार्वजनिक बांधकाम विभाग,४ था मजला,मुख्य इमारत,मादाम कामा रोड,हुतात्मा राजगुरु चौक,मंत्रालय,मुंबई ४०० ०३२,यांच्या द्वारा पत्रव्यवहार करण्यात आले होते.
दिनांक ०८.०१.२०२६ रोजी अप्पर मुख्य सचिव,सार्वजनिक बांधकाम विभाग यांचेकडील बैठकीत झालेल्या चर्चेनुसार प्रत्येक सा. बां.प्रादेशिक विभागातील एक रस्ता राष्ट्रीय महामार्ग घोषित करणेबाबत निर्देश देण्यात आलेले होते.
सदर प्रस्ताव तात्काळ विहित नमुन्यात व आवश्यक कागदपत्रांसह परिपूर्ण सादर करण्याबाबत कळविण्यात आले होते.



