राकेश चव्हाण
कुरखेडा तालुका प्रतिनिधी
कुरखेडा नगरपंचायत हद्दीतील आदिवासी समाजाच्या वस्ती भागात मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आदिवासी विकास निधी (TSP) अंतर्गत विविध विकासकामांना तात्काळ मंजुरी देण्याची मागणी निवेदना द्वारे करण्यात आली आहे.
भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक सेल गडचिरोली जिल्हाध्यक्ष तथा नगरपंचायत कुरखेडा उपाध्यक्ष मो. कलाम शेख (बबलु हुसैनी) यांनी याबाबत महाराष्ट्र शासनाचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांना निवेदन सादर केले आहे. हे निवेदन माजी आमदार तथा महाराष्ट्र प्रदेश अनुसूचित जमाती आघाडीचे अध्यक्ष डॉ. देवराव होळी यांचे उपस्थीतीत देण्यात आले आहे.
कुरखेडा नगरपंचायत क्षेत्रातील प्रभाग क्रमांक १७ मध्ये आदिवासी समाजाची मोठी वस्ती असून या भागात मूलभूत सुविधांचा अभाव आहे. नागरिकांना दैनंदिन जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने या भागात आदिवासी शमशान भूमीसंरक्षण भिंत, गटार बांधकाम, सोलर हायमास्ट लाईट तसेच सिमेंट काँक्रीट (सी.सी.) रस्त्याचे बांधकाम तातडीने निधी उपलब्ध करण्याची मागणी करण्यात आली आहे.
या सर्व कामांसाठी अंदाजे १ करोड २५ लाख रुपयांचा निधी आदिवासी विकास निधी (TSP) योजनेतून मंजूर करण्यात यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. सदर विकासकामांना मंजुरी मिळाल्यास परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळेल व मूलभूत सुविधांमध्ये सुधारणा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे..निवेदन सादर करता वेळि आमदार संजय पुराम, भाजप जिल्हाध्यक्ष रमेश बरसागडे, पदाधिकारी सुरेश शाह उपस्थित होते.



