रामदास ठुसे
नागपूर विभागीय प्रतिनिधी
चिमूर/- स्थानिक गांधी सेवा शिक्षण समिती द्वारा संचालित राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालयात विद्यार्थी विकास विभागाकडून वार्षिकोत्सव 2026 चे दिनांक6 ते 08 मार्च या काळात आयोजन करण्यात आले होते. मार्च 08 ला समारोपीय बक्षीस वितरण समारंभांस चिमूर विधानसभा क्षेत्रातील लोकप्रिय आमदार बंटीभाऊ भांगडीया उपस्थित होते.
त्यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की,पुस्तकी ज्ञानासोबतच क्रीडा व सांस्कृतिक उपक्रमांमधून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास घडतो. विद्यार्थ्यांमधील अफाट बुद्धिमत्ता व कौशल्याला योग्य व्यासपीठ मिळणे ही काळाची गरज आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या नावाने ओळखले जाणारे हे महाविद्यालय म्हणजे चिमूर परिसरातील ज्ञान, संस्कार आणि गुणवत्तेचे केंद्र आहे. येथील विद्यार्थी केवळ शैक्षणिकच नव्हे, तर क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातही आपली छाप उमटवत आहेत, ही बाब अभिमानास्पद आहे. खेळात हारजित असते, परंतु मैदानावर दाखविलेले धाडस, चिकाटी आणि सांघिक भावना आयुष्यभर साथ देते.
आज ज्या विद्यार्थ्यांनी आपले कलागुण सादर केले, ते उद्या नक्कीच उज्वल यश संपादन करतील असा दृढ विश्वास व्यक्त केला.तसेच भविष्यात चिमूर तालुक्यातील सर्व महाविद्यालयानी विद्यार्थ्यांसाठी सामूहिक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करावे असे यावेळी जाहीर केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा गांधी सेवा शिक्षण समितीचे अध्यक्ष डॉ. दीपक यावले कोषाध्यक्ष प्रा. महादेवराव पिसे तसेच श्री. राजूभाऊ देवतळे,राज्य परिषद सदस्य श्री.संजय नवघडे उपनगराध्यक्ष, नगरपरिषद चिमुर श्री. घनश्यामभाऊ डुकरे संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती व राज्य परिषद सदस्य, पुणे, श्री. मनिष तुमपल्लीवार भाजपा मंडळ अध्यक्ष, श्री. श्रेयस लाखे, नगरसेवक न प चिमूर,कार्यकारी प्राचार्य लेप्टनंट डॉ. प्रफुल्ल बन्सोड, डॉ. कार्तिक पाटील डॉ. हरेश गजभिये उपस्थित होते.
सूत्रसंचालन विद्यार्थी विकास विभागाचे प्रभारी प्रा डॉ नितिन कत्रोजवार आभार प्रा. राकेश कुमरे, यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. पितांबर पिसे, डॉ उदय मेंडूलकर, प्राध्यापक- वृंद, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.



