लक्षवेधी
राकेश चव्हाण
तालुका प्रतिनिधी कुरखेडा
कूरखेडा शहरातील श्रीराम नगर परिसरात पाणीपुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन फुटल्यामुळे परिसरातील पाणीपुरवठा मागील आठ दिवसांपासून पुर्णतः बंद झाला आहे.त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पाणीपुरवठा खंडित झाल्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे काही नागरिकांना दूरवरून(ढोल्या वरुन) पाणी आणावे लागत असून महिलांना व ज्येष्ठ नागरिकांना याचा विशेष त्रास सहन करावा लागत आहे.
स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नगर पंचायत प्रशासनाकडे तोंडी तक्रार करूनही अद्याप दुरुस्तीचे काम पूर्ण झालेले नाही,अशी नाराजी व्यक्त केली जात आहे.
विशेष सुत्रांचा माहितीनुसार पाणी पुरवठा ला लागणारी साधन सामुग्रीचा पुरवठा करणार्या एजन्सी सामग्री पुरविण्यास दिरंगाई करित असल्याचे कळते आहे.
नगर पंचायत कुरखेडा प्रशासनाच्या नियोजनशून्य कार्यप्रणालीमुळे नागरिकांना या समस्येला सामोरे जावे लागत असल्याची टीका सामान्य नागरिकांकडून केली जात आहे.



