Home Maharashtra गों.वि.आयोजित युवा महोत्सव-२०२५-२६ मध्ये ग्रामगीता महाविद्यालयाची “भरारी”…. 

गों.वि.आयोजित युवा महोत्सव-२०२५-२६ मध्ये ग्रामगीता महाविद्यालयाची “भरारी”…. 

शुभम गजभिये

विशेष प्रतिनिधी…

         विद्यार्थी विकास विभाग,गोंडवाना विद्यापीठ,गडचिरोली दिनांक ५,६,व ७ मार्च-२०२६ रोजी आयोजित ॴतर-महाविद्यालयीन सांस्कृतिक युवा महोत्सव “भरारी-२०२५-२६ स्पर्धेमध्ये ग्रामगीता महाविद्यालय,चिमूर ने सर्वसाधारण उपविजेता चषक पटकाविला. 

        तसेच सर्वसाधारण विजेता कला प्रकार “नाटक” मध्ये सांघिक चषक पटकाविला.या युवा महोत्सवामध्ये ग्रामगीता महाविद्यालयातील एकूण २३ विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला होता.

      त्यामध्ये एकांकिका,प्रहसन,पेंटिंग व शास्त्रीय ताल या स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक पटकाविला. तसेच कोलाज व मूकनाट्य या स्पर्धांमध्ये द्वितीय क्रमांक पटकावला.

      त्याचप्रमाणे लोकनृत्य,क्ले मॉडलिंग,समूहगीत,वेस्टर्न ग्रुप व वेस्टर्न सोलो सॉंग या स्पर्धांमध्ये तृतीय क्रमांक पटकाविला. एकांकिका,प्रहसन व मूकनाट्य यामध्ये गौरी चंदनखेडे,सविता नन्नावरे,पुष्पक तिवाडे,संदीप जीवतोडे,वैभव बारेकर,निखिल झाडे,सुमित नागोसे,मुकेश भिमटे,चांदणी शेंद्रे,रूपाली सोनटक्के व लावण्या धोटे या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. 

       त्याचप्रमाणे शास्त्रीय तालवाद्य या स्पर्धेमध्ये गुरुदेव सूर्यवंशी याने प्रथम क्रमांक पटकाविला व पेंटिंग या स्पर्धेमध्ये धीरज लोथे याने प्रथम तर क्ले मॉडलिंग स्पर्धेमध्ये तिसरा क्रमांक पटकावला.कोलाज या स्पर्धेमध्ये कु. प्रणाली चानुरकर हिने द्वितीय क्रमांक पटकाविला तर वेस्टर्न सोलो सॉंग स्पर्धेमध्ये कु.समीक्षा भरडे हिने तृतीय क्रमांक पटकाविला.  

        लोक नृत्य स्पर्धेमध्ये कु.सविता नन्नावरे, कु. समीक्षा नन्नावरे,कु.गौरी चंदनखेडे,कु.आश्लेषा चन्ने,कु. चांदणी शेंद्रे,कु.वैष्णवी सातपुते,कु.संगीता चौधरी,कु.प्राजक्ता लाडसे,कु.प्राची निखारे आणि कु.रूपाली सोनटक्के या विद्यार्थिनींनी तृतीय क्रमांक पटकाविला.

       तसेच समूहगीत स्पर्धेमध्ये गुरुदेव सूर्यवंशी,मुकेश भिमटे,कु.प्राजक्ता लाडसे,कु.प्राची निखारे,कु.आश्लेषा चन्ने व चांदणी शेंद्रे या विद्यार्थ्यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. 

       डॉ.प्रशांत बोकारे कुलगुरू गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली व डॉ.प्रिया गेडाम संचालक विद्यार्थी विकास विभाग गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली, यांनी विद्यार्थ्यांना चषक देऊन त्यांचे अभिनंदन केले व व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

         याचबरोबर डॉ.सुनंदा आस्वले,प्राचार्य,ग्रामगीता महाविद्यालय व प्रा.डॉ.संदीप सातव,प्रा.डॉ. हुमेश्वर आनंदे,प्रा.डॉ. निलेश ठवकर,प्रा.डॉ.वरदा खटी,प्रा.डॉ.युवराज बोधे,प्रा.डॉ.बिजनकुमार शील,प्रा.डॉ.सरताज शेख,प्रा.कु.प्रज्ञा खोब्रागडे,गौरव मेश्राम व प्रा.डॉ.सुमेध वावरे,समन्वयक,विद्यार्थी विकास विभाग व तसेच कमलेश दडमल,मनसाराम गोडमारे,निखिल भालेराव,व संजय खोब्रागडे आणि सर्व प्राध्यापक वृंद,शिक्षकेत्तर कर्मचारीवर्ग यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.