Home Maharashtra ‘हाऊस ऑफ द इयर’चा मानकरी शक्ती हाऊस…

‘हाऊस ऑफ द इयर’चा मानकरी शक्ती हाऊस…

ऋग्वेद येवले 

   उपसंपादक 

साकोली : नवजीवन कॉन्व्हेंट अँड इंग्लिश प्रायमरी स्कूल, सीबीएसई, साकोली येथील “शक्ती हाऊस” ला यावर्षीचा “हाऊस ऑफ द इयर” पुरस्कार प्रदान करण्यात आला. हाऊस अॅक्टिव्हिटीच्या समारोप समारंभासाठी अध्यक्ष म्हणून प्राचार्या सौ. भारती व्यास उपस्थित होत्या. प्रमुख उपस्थिती म्हणून डॉ. लोकानंद नवखरे (प्राचार्य, नवजीवन विद्यालय अँड ज्युनियर सायन्स कॉलेज) तसेच शाळा व्यवस्थापक विनोद किरपान, प्रशासकीय अधिकारी सतिश गोटेफोडे व पर्यवेक्षिका वंदना घोडीचोर उपस्थित होते.

          या वेळी सर्व मान्यवरांच्या हस्ते शक्ती हाऊस ला ‘हाऊस ऑफ द इयर’ तर सामर्थ्य हाऊस ला ‘रनर-अप ऑफ द इयर’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

          विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाबरोबरच त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा आणि विविध क्षेत्रांत प्रगती साधता यावी या उद्देशाने अभ्यासाला पूरक अशा हाऊस अॅक्टिव्हिटीची सुरुवात सत्र २०१४-१५ पासून दरवर्षी करण्यात येते. यामध्ये विद्यार्थ्यांची समप्रमाणात शौर्य, सामर्थ्य, शक्ती व साहस या चार गटांत विभागणी करण्यात येते.

        या हाऊस अॅक्टिव्हिटीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या क्रियात्मक, भावात्मक, बौद्धिक व शारीरिक सर्वांगीण विकासासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये मैदानी स्पर्धा, अंतरंग स्पर्धा, भाषण, गीतगायन, चित्रकला, मुखवटा रंगकाम अशा विविध प्रकारच्या स्पर्धांचा समावेश होता.

       या सर्व स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत शक्ती हाऊस ने ‘हाऊस ऑफ द इयर’ तर सामर्थ्य हाऊस ने ‘रनर-अप ऑफ द इयर’ हा मान पटकावला. विजयी हाऊसच्या जल्लोषाने संपूर्ण नवजीवन परिसर दुमदुमून गेला.

        या यशाचे श्रेय हाऊसचे प्रभारी विजय परशुरामकर, रोजी पठाण, प्रीती फुलबांधे, प्रियंका झोडे, स्वेजल शहारे, रेखा हातझडे तसेच संपूर्ण हाऊस अॅक्टिव्हिटीचे प्रभारी वैशाली भगतकर, श्रीधर खराबे आणि उषा मीना यांना देण्यात आले. नवजीवन विद्यालयातील समस्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी शक्ती व सामर्थ्य हाऊसचे कौतुक केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दीपा रीनाईत यांनी केले.