Home Maharashtra वैजयंती गहुकर योगासन गृपची चमकदार कामगिरी!…

वैजयंती गहुकर योगासन गृपची चमकदार कामगिरी!…

शुभम गजभिये

  विशेष प्रतिनिधी

     चंद्रपूर जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशन,वरोराच्या वतीने आज रविवारी जिल्हास्तरीय लेवल योगासन स्पोर्ट कॉम्पिटीशन आयोजित करण्यात आली होती.

       पार पडलेल्या या स्पर्धेत महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलं चंद्रपूरच्या जेष्ठ सदस्य योगाशिक्षक वैजयंती गहूकर यांच्या योगा टीमने भाग घेत चमकदार बजावली.त्यांच्या टीमला आयोजकांकडून गोल्ड मेडल बहाल करण्यात आले .

      या स्पर्धेत योगा टीमच्या वैजयंती गहुकर,जयश्री कुंभारे,संगीता पाऊनकर,नयना मुलमुले,शोभा सोनकुसरे,मंगला भटपल्लीवार,व अश्विनी धकाते यांनी आपला सहभाग नोंदविला होता.

        वैजयंती योगा गृपने सदरहु स्पर्धेत गोल्ड मेडल प्राप्त केल्याबद्दल सहज सुचलं महिला गृपच्या मुख्य मार्गदर्शिका मायाताई कोसरे अधिवक्ता मेघा धोटे, संयोजिका रंज्जू दिलीप मोडक सहसंयोजिका नलिनी आडपवार,शैला चिमड्यालवार,साधना धकाते,रजनी रणदिवे,किरण साळवी,अधिवक्ता अंजली गुंडावार,संजीवनी धांडे,सविता कोट्टी,मंगल मिसाळ,अधिवक्ता प्रेरणा सहारे,पूजा पाटील यांनी त्या टीमचे अभिनंदन केले आहे.