Home Maharashtra गोंदिया आश्रम शाळेतील अकरा वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू….  — पालकांचा व्यवस्थापकांवर गंभीर...

गोंदिया आश्रम शाळेतील अकरा वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू….  — पालकांचा व्यवस्थापकांवर गंभीर आरोप..‌

     राकेश चव्हाण 

कुरखेडा तालुका प्रतिनिधी 

       गोंदिया जिल्ह्यातील मालिनीताई सुखदेव दहिवले आदिवासी आश्रम शाळा,एरंडी नवेगाव येथे शिकणाऱ्या इयत्ता पाचवीच्या नूतन मडावी (वय ११) या चिमुकलीचा होळी सुट्टीदरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पालकांनी शाळेच्या व्यवस्थापकांवर थेट आरोप लावत पोलिस स्टेशन ला तक्रार दाखल केली असून,या प्रकरणाने आदिवासी समाजात संतापाची लाट पसरली आहे.

          नूतन निताराम मडावी रा.परसटोला (ता.अर्जुनीमोरगाव जि.गोंदिया) होळीच्या सुट्टीसाठी आश्रम शाळेच्या कर्मचार्यानी तिच्या मुळ गावी घरी पोहोचवले.

         शाळेतील सोडण्यास आलेल्या त्या कर्मचाऱ्यांनी तिला घरी सोडताना तिच्या प्रकृतीबाबत पालकांना कोणतीही माहिती दिली नाही,असा पालकांचा आरोप आहे. घरी पोहोचल्यानंतर तिची तब्येत एकदम खालावली. प्रथमत: स्थानिक खासगी डॉक्टर यांच्याकडे उपचार सुरू केले.

        प्रकृतित सुधारणा न दिसल्याने ३ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.तिथून तिला प्रथमोपचार करित प्रकृती गंभीर असल्याने गडचिरोली जिल्हा रुग्णालय येथे रेफर करण्यात आले.

       रस्त्यातच 108 रुग्णवाहिकेत (एम्ब्युलन्स मध्ये) तिची प्रकृती खालावल्याने आरमोरी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. 

          पालकांचे मुख्य आरोप आहे की शाळा व्यवस्थापनाने आजाराची पुर्ववत माहिती दिली नाही किंवा “मुलीची प्रकृती बरी नाही हे सांगितले असते तर आम्ही वेळीच लक्ष दिले असते.व्यवस्थापनाच्या या दुर्लक्षामुळे आमची मुलगी गेली,” असे नूतनच्या आई-वडिलांनी सांगित आक्रोश व्यक्त केला.

         शव पोस्टमॉर्टम नंतर आरमोरी रुग्णालयातील काही कर्मचाऱ्यांनी शव घरी नेण्यास रुग्णवाहिका उपलब्ध करुण देण्यासाठी 3 हजार रु. मागितल्याचा गंभीर आरोप पालकांनी केला आहे.गरिब परिस्थीतीत इतके पैसे कुठून देणार करिता गावीच कळवून खाजगी वाहनाने शव परसटोला येथे नेण्यात आले.

         ६ मार्च रोजी पालकांनी केशोरी पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली आहे.या प्रकरणाची चौकशी पोस्टमार्टम रिपोर्ट प्राप्त होताच चौकशी करु असे पोलीस ठाण्यात सांगण्यात आले.पोलिस विभाग,आदिवासी विकास विभाग आणि शिक्षण विभाग यांनी तातडीने कारवाई करावी,अशी मागणी होत आहे.

         आदिवासी शाळांमधील वारंवार समोर येणाऱ्या घटनांमुळे गडचिरोली-गोंदिया भागात आदिवासी आश्रम शाळांमधील मुलांच्या आरोग्य, सुरक्षा आणि काळजीच्या बाबतीत अनेकदा तक्रारी समोर येतात.नुकतेच अशाच घटनांमुळे लोकांचा संताप वाढला आहे.

       आदिवासी संघटना आणि स्थानिक राजकीय नेत्यांनी नूतनच्या पालकांना पूर्ण पाठिंबा दिला असून,या प्रकरणात पारदर्शक चौकशीची मागणी केली आहे.न्यायाची मागणी “आश्रम शाळा मुलांसाठी दुसरे घर असते.तिथे आजारपणात तातडीने माहिती देणे, वैद्यकीय मदत पुरवणे ही जबाबदारी आहे.

       एका चिमुकलीचा मृत्यू झाला तरी शाळा आणि रुग्णालय यंत्रणेच्या चुका का?” असा सवाल पालक आणि समाज करत आहे. नूतन मडावीच्या कुटुंबीयांना भावपूर्ण श्रद्धांजली. 

       या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई व्हावी आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कडक उपाययोजना व्हाव्यात,अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.