कारण……..
(अनेक महत्वाच्या कारणापैकी पुढील एक कारण )
आमचे आजचे ( 2014 ते आजपर्यंतचे ) प्रधानमंत्री नरेंद्र मोदी. यांच्या भोवतीच संपूर्ण देशाचे राजकारण फिरत आहे. आज ते देशाचे एकमेव नेते आहेत. यात कुणाचेही दुमत असण्याचे कोणतेही कारण नाही.
जेंव्हा देशाचे प्रधानमंत्री म्हणून त्यांनी 2014 मध्ये शपथ घेतली. तेंव्हा प्रथम त्यांनी गुजरातमधील प्रलंबित असलेला………
सरदार वल्लभभाईं पटेल ( देशाचे पहिले गृहमंत्री ) यांचा गुजरातमध्ये सर्वात उंच पुतळा उभारण्याचे काम हाती घेतले. 3000 कोटी रुपये खर्च करून नर्मदा नदीच्या पात्रात सरदार सरोवराच्या धरणाच्या काठावर तो उभारून पूर्ण करून त्याचे उदघाटन करून जनतेसाठी खुला केला………..
खूप चांगले अभिनंदनीय काम केले. त्यांचे कौतुक मी अंतःकरणापासून करतो.
कुणीही एखादा व्यक्ती जेंव्हा त्याच्या हातात पैसा येतो, तेंव्हा तो त्याच्या अनेक वर्षापासुनच्या असलेल्या ईच्छा प्रथम तो पूर्ण करतो. मग ते घर असेल, प्लॉट घेणे असेल, मुलीचे / मुलाचे लग्न असेल, किंवा आणखी काहीही असू शकेल.
परंतू , आमच्या प्रधानमंत्र्याचे प्रलंबित स्वप्न होते. सरदार पटेलांचे स्मारक बनवण्याचे…….
जेंव्हा एखाद्या आदर्शाचा आपण घरात साधा फोटो लावतो……
तेंव्हा त्या आदर्शाने त्याच्या जीवनात जे चांगले कार्य केले आहे, त्या चांगल्या केलेल्या कार्याचा आदर्श घेतो आणि त्यांच्या अधुऱ्या राहिलेल्या स्वप्नांना साकार करण्याचा संधी मिळताच आपण प्रयत्न करतो आणि यशस्वी होतो.
अगदी हेच समीकरण इथे मोदीजींना सुद्धा लागू होते……!
मग मोदीजी इथे चुकले कसे…..?
कारण…….
म. गांधी यांची 30 जानेवारी 1948 रोजी हत्या झाली, नथुराम गोडसेच्या कुसंस्कृत निर्मितीचे मूळ धागेदोरे जेंव्हा RSS कडे गेले. तेंव्हा सरदार वल्लभभाई पटेल यांनी RSS वर ताबडतोब बंदी घातली.
RSS चे तत्कालीन अध्यक्ष गोळवलकर गुरुजी आणि शामाप्रसाद मुखर्जी यांना शेवटी सहा महिने तुरुंगात जावे लागले. तुरुंगातून बाहेर आल्यावर सरकार आणि RSS मध्ये बंदी उठविण्यासाठी वाटाघाटी झाल्या. त्यावेळी या दोघांना दिल्लीत आल्यावर सरदार पटेलांनी भेट सुद्धा नाकारली होती. शेवटी तीन अटीवर या RSS वरची बंदी उठविण्यास पटेल तयार झाले.
(1) RSS ने राज्यघटना मान्य करून कधीही तीला विरोध करू नये.
(2) भारताच्या राष्ट्रध्वजाला नेहमी सलामी द्यावी.
(3) कोणत्याही सदस्याने शस्त्र बाळगू नये केवळ त्यांनी सांस्कृतिक कार्य करावे.
या तीन्ही अटी लेखी शपथपत्र हमी देऊनच *RSS* वरची बंदी उठवली होती.
परंतू , आज याच RSS चे स्वरूप काय आहे …….?
किती सांस्कृतिक महापुरुष RSS नी गेल्या 100 वर्षात निर्माण केले…..?
ज्यांना RSS नी बळजबरी आपले आदर्श म्हणून मरणोत्तर मानले. उदा. नेताजी सुभाष चंद्रबोस, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू इत्यादी त्या आदर्षांनी तर जीवनभर RSS चा मरेपर्यंत विरोधच केलेला होता.
जर आज हीच RSS स्वतःचे शस्त्र बाळगते…….
राष्ट्रध्वज कधी आपल्या कार्यालयावर फडकवत नाही…….
दिल्लीच्या जंतरमंतरवर संविधान जाळण्याची विकृती RSS निर्माण करते……..
परंतू , ज्या सरदार पटेलांचा जगात सर्वात उंच पुतळा आमच्या प्रधानमंत्री मोदींनी उभारला…..
त्याच सरदार वल्लभभाई पटेलांचा आदर्श घेऊन RSS वर कायमची बंदी गेल्या 12 वर्षात मोदींनी का आणली नाही……?
उलट अमित शहा संसदेत म्हणतात, ” यहाँ पर देश का प्रधानमंत्री RSS का है और देश का गृहमंत्री भी RSS का है. क्या कर लोगे आप. ( विरोधकांना उद्देशून ). “
असे आहे……!
म्हणूनच माझा आणि आमचा RSS / मोहन भागवत / मोदी /शहा / फडणवीस / हतबल मित्रपक्ष या सर्वांचा संविधानविरोधी शक्ती म्हणून विरोध करतो……!
विरोध करतो……
विरोध करत राहू……
विरोध करत राहणारच……
हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे…….!


