वृत्त विश्लेषण
प्रदीप रामटेके
मुख्य संपादक
दारु हे हृदय,सेक्स आणि मेंदूवर मारा करीत असल्याने,मद्यपिंचे मानसिक व शारीरिक संतुलन केव्हा बिघडेल हे सांगता येत नाही.
यामुळे मद्यपी केव्हा काय बोलतील आणि काय कृती करतील हे सांगणे कठीण असते.
पण,मद्यपींच्या अयोग्य बोलण्याचा आणि अयोग्य कृतीचा अती त्रास होवू लागला की,कुटुंबातील आणि परिसरातील नागरिक परेशान होतात हे सत्य आहे.
मद्यपी व्यक्तींचे वेगवेगळ्या पध्दतीचे बेताल बोलणे सहन होत नाही,तेव्हा एखादा पुढील व्यक्ती सुध्दा रागाच्या भरात अयोग्य व बेकायदा कृती करुन बसतो हेही तितकेच खरे आहे.
दारुचा अवैध व्यवसाय,वैध व्यवसाय जिकडे-तिकडे मोठ्या प्रमाणात वाढला असल्याने मद्यपिंची संख्या सुध्दा तितक्याच वेगाने वाढत आहे.
मद्यपिंची वाढणारी संख्या आणि त्यांच्या माध्यमातून ओढवणारा मानसिक व शारीरिक तान अनेक कुटुंबांच्या बरबादीचे कारण ठरू लागलाय…
याचबरोबर दारुड्यांचा शौक आणि त्यांचे विचार,कृती हे समाजमनावर आघात करु लागली असल्याने आपोआपच अनेक महिलांच्या आणि मुलांच्या मनात दारुड्यांबाबत धृणा निर्माण होत आहे.
हिच धृणा कालांतराने द्वेषात,रागात,क्रोधात रुपांतर होत असल्याने अणावर आलेला राग कधी बयोकाचा खून करतोय,कधी मुलांचा खून करतोय,कधी नवऱ्याचा खून करतोय,तर कधी बापाचा खून करतोय,असे आजपर्यंतच्या घटनाक्रमावरुन दिसून आले.
तद्वतच,”दारुची माय आणि कट कटा खाय,असी मन समाज मनात प्रचलीत आहे.म्हणजे दारु पिणारा व्यक्ती केव्हा काय बोलेल आणि केव्हा कुणाला कसा त्रास देईल,परेशान करेल याचा नेम नसतो.
विशेषतः दारु पिणाऱ्याची सवय अरेरावीची,भांडखोर,आणि मनामनात कलह निर्माण करणारी राहात असल्याने,ते केव्हा कुणासी कशावरून भांडणतंटे करतील हे सांगता येत नाही…
दारु पिणाऱ्यांची सवय स्थिर राहात नसल्याने ते कुटुंबाचा ऱ्हास करतातच,पण स्वत:चे आरोग्य धोक्यात आणतात.मुलांचे भविष्य उध्दवस्त करतात.
दारु पिन्याची मानसिकता संगत गुणांचा परिणाम असला तरी अनुवंशिक गुणधर्म सुध्दा याला कारणीभूत असतात.दारुड्यांमुळे अनेक पिड्या बरबाद झालेल्या आहेत…
याचबरोबर दारु संसयी मानसिकता तयार करीत असल्याने अनेक जनांनी बायकोचा खून केला,अनेक जनांनी बायकोला विष प्राशन करुन किंवा आत्महत्या करुन मारण्यापर्यंत परिस्थिती निर्माण केली,तर अनेकांनी पत्नी सोबत सोडचिठ्ठी घेतली.
दारुड्यांमुळे,”याची डोळा, संसाराची धुळधाणी होत असताना बघून पत्नींचे,मुलांचे हृदय पिटाळून निघतय,मन अनेकदा जळतय.पण,त्यांच्यापुढे हाल अपेष्टांचे जिवन जगल्याशिवाय पर्याय राहात नाही.
फाटक्या कपड्यात मुलांचे भविष्य बघताना आई मनाला अनेकदा मारते आणि हृदयाला अनेकदा स्तब्ध करते तेव्हा ती आई स्वत:ला प्रश्र्न विचारते,माझ्या आईबापाने मला का म्हणून जन्म दिलाय?,मला माझ्यासह माझ्या मुलांचे संगोपन बरोबर करता येत नाही!..
महाराष्ट्र राज्यासह भारत देशातील करोडो माऊल्या रोज रडतात,रोज कटतात,याचे भान मात्र कुणालाच नाही!,या परंपरागत व्येवस्थेला काय म्हणावे?
दिनांक २३/०२/२०२६ रोज सोमवारला चंद्रपूर जिल्हातंर्गत चिमूर तालुक्यातील अप्पर तालुक्याचे ठिकाण असलेल्या भिसी (महाराष्ट्र) येथे संदेश मच्छिंद्र मेश्राम यांनी,दारुडा बापाचाच नायलॉनच्या दोरीने गळा आवळून खून केला असल्याची धक्कादायक घटना घडली.
यामुळे दारुड्या बाप मुलांचा,पत्नीचा होत नाही,आणि दारुडे हे वेळप्रसंगी कुणाचेच राहातं नाही,हे कालच्या खून प्रसंगाने सांगून टाकले…
म्हणूनच दारु खतरनाक आहे!


