Home Maharashtra मौजा मालेवाडा येथील श्री.अंकीत दहिवले धडपडतात मालकी हक्काच्या निवाऱ्यासाठी…. — आमदार...

मौजा मालेवाडा येथील श्री.अंकीत दहिवले धडपडतात मालकी हक्काच्या निवाऱ्यासाठी…. — आमदार किर्तीकुमार भांगडिया,उपविभागीय अधिकारी किशोर घाडगे,तहसीलदार श्रिधर राजमाने दिलासा देतील काय?

उपक्षम रामटेके/शुभम गजभिये

           दखल न्यूज भारत..

       घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी स्वत:च्या मालकी हक्काची जागा नसल्याने चिमूर तालुकातंर्गत मौजा मालेवाडा येथील श्री.अंकीत दहिवले धडपडतात मालकी हक्काच्या निविऱ्यासाठी!…

         श्री.अंकीत दहिवले यांना मालकी हक्काची जागा नसल्याने ते मौजा मालेवाडा येथे अतिक्रमण करून सरकारी जागेवर आपल्या कुटुंबासह कच्या घरात राहतात.

           ते व त्यांची पत्नी मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.हातावर आणणे आणि पाणावर खाणे अशी त्यांची बिकट परिस्थिती.

         श्री.अंकीत दहिवले प्रधानमंत्री आवास योजना व रमाई आवास योजनेंतर्गत घरकुल मंजूर करण्यासाठी धडपडतात.परंतु अळचण आहे ते घरकुल मंजूर करण्यासाठी मालकी हक्काच्या जागेची…

       ज्या सरकारी जागेवर श्री. अंकीत दहिवले राहतात त्या जागेचा मालकी हक्क पट्टा मिळावा म्हणून ते महसूल मंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे यांच्यापर्यंत पोहोचले.

           त्यांना कायदेशीर ज्ञान नसल्यामुळे त्यांनी तहसीलदार श्रिधर राजमाने चिमूर,उपविभागीय अधिकारी किशोर घाडगे चिमूर,आणि जिल्हाधिकारी विनय गौडा चंद्रपूर यांच्याकडून,घरकुल मंजूर करण्यासाठी कच्चे मकान बांधून राहात असलेल्या जागेचा मालकी हक्क पट्टा मिळवून घेता आली.

         ते मागील २० वर्षांपासून सदर जागेवर कच्या इमल्यात राहतात.त्यांना गरज आहे संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाची व त्यांतंर्गत सदर जागेचा मालकी हक्क पट्टा मिळण्यासाठी योग्य कारवाईची…

           दारिद्रयात जिवन जगणाऱ्या श्री.अंकीत दहिवले यांना राहत्या जागेचा मालकी हक्क पट्टा देण्यासाठी चिमूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार किर्तीकुमार भांगडिया,उपविभागीय अधिकारी किशोर घाडगे चिमूर,तहसीलदार श्रिधर राजमाने चिमूर,यांनी कायदेशीर सहकार्य करावे,अशी श्री.अंकीत दहिवले यांची त्यांना सार्वजनिक विनंती आहे.

           आमदार किर्तीकुमार भांगडिया,चिमूर उपविभागीय अधिकारी किशोर घाडगे,चिमूर तहसीलदार श्रिधर राजमाने,श्री.अंकीत दहिवले यांना दिलासा देण्यासाठी पुढे येतील अशी अपेक्षा बाळगण्यात काहीच अळचण नाही….

         जागे संबंधात कायदा आणि कायद्याचा उद्देश घरकुल योजनेसाठी सकारात्मक आणि योग्य असला तरी स्थानिक पातळीवर तो गुंतागुंतीचा ठरत असल्याने किंवा ठरविला जात असल्याने अनेक गोरगरीबांना घरकुल योजनेचा लाभ घेता येत नाही,हे सत्यच आहे…

         आमदार किर्तीकुमार भांगडिया यांनी जनता दरबार लावून घरकुल मंजूर संबंधाने अतिक्रमण जागा,सदर हजारो व्यक्तींच्या मालकी हक्काची करावी व त्यांना तसे मालकी हक्क पट्टे मिळवून द्यावेत,अशी आर्त हाक चिमूर तालुक्यातील अतिक्रमण जागेवरील कच्चा घरधारकांची आहे..