दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : सायंकाळनंतर अंधाराच्या गर्तेत जाणाऱ्या चावडी चौकात अखेर प्रकाशझोत पडला आहे. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या स्ट्रीट लाईटच्या मागणीला यश मिळत येथे नवीन दिवा बसविण्यात आला. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
चावडी चौकात सर्व दुकाने बंद झाल्यावर रात्री नऊ ते पहाटे सहा वाजेपर्यंतच्या अंधारामुळे महिलां, ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांना वारकऱ्यांना ये-जा करताना असुरक्षिततेची भावना निर्माण होत होती. काही वेळा किरकोळ अपघातांचाही धोका वाढला होता. नागरिकांनी वारंवार तक्रारी व निवेदने देत पाठपुरावा केल्यानंतर प्रशासनाने याची दखल घेत काम मार्गी लावले.
नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक नगरसेविका कांचन येळवंडे व नगरसेवक गोविंद कुऱ्हाडे यांनी या कामासाठी पुढाकार घेतला.
यावेळी कांचन येळवंडे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले, “चावडी चौक हा परिसरातील महत्त्वाचा आणि वर्दळीचा भाग आहे. नागरिकांनी व्यक्त केलेल्या भावना आणि त्यांच्या सुरक्षिततेची काळजी लक्षात घेऊन आम्ही तातडीने प्रशासनाशी समन्वय साधला.
स्ट्रीट लाईट बसविल्यामुळे केवळ चौक उजळला नाही, तर नागरिकांच्या मनातील असुरक्षिततेचाही अंधार दूर झाला आहे. पुढेही मूलभूत सुविधांसाठी आम्ही प्राधान्याने काम करू.” दरम्यान, नव्याने बसविण्यात आलेल्या स्ट्रीट लाईटमुळे परिसर उजळून निघाला असून नागरिकांनी संबंधित लोकप्रतिनिधींचे आभार मानले आहेत.



