शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
चिमूर तालुक्यातील मौजा मालेवाडा येथील जेतवन बुद्ध विहारात संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला भीमज्योती महिला मंडळ अध्यक्षा गीता मेश्राम,अशोक मेश्राम,आशिक रामटेके,आराध्या बोरकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण केले व दीपप्रज्वलन करून अभिवादन केले.
आराध्या बोरकर यांनी संत गाडगेबाबा यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.गाडगे महाराज हे अनिष्ट रूढी आणि परंपरेवर जोरदार ,प्रहार करत होते, कीर्तनाच्या माध्यमातुन त्यांनी आयुष्यभर प्रबोधनाचे काम केले,गाडगेमहाराज यांचा वैज्ञानिक दृष्टीकोन होता.
त्यांनी समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. स्वच्छता आणि चारित्र्याची शिकवण दिली.गाडगे महाराजांमध्ये गोरगरीब दीनदलित ह्यांच्यामधील अज्ञान,अंधश्रद्धा,अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळ होती.
लोकांमधील अंधश्रद्धा आणि गरिबी दूर करण्यासाठी शिक्षणाचे महत्त्व त्यांना माहित होते.प्रसंगी घरातील वस्तू विका पण आपल्या पाल्यांना शिकवा असे ते नेहमी सांगायचे.अशा शब्दात मान्यवरांनी संत गाडगेबाबा यांच्या कार्याचं स्मरण करून त्यांना अभिवादन केल.
याप्रसंगी शालेय विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश मेश्राम यांनी केले.आभार खुशी पाटील यांनी मानले.



