Home Maharashtra माहितीचा अधिकार कार्यकर्ता,चंद्रपूर जिल्हा अध्यक्षपदी तलाठी विनोद खोब्रागडे यांची नियुक्ती…

माहितीचा अधिकार कार्यकर्ता,चंद्रपूर जिल्हा अध्यक्षपदी तलाठी विनोद खोब्रागडे यांची नियुक्ती…

   उपक्षम रामटेके

मुख्य कार्यकारी संपादक..

        दिनांक २२/२/२०२६ रोजी “बाप” फाऊंडेशन तर्फे,तथा सामाजिक संस्था प्रतिनिधी द्वारे,”चिंतन बैठक, नागपूर येथील रवी भवन सिव्हिल लाइन येथे विभागीय स्तरावर माहितीचा अधिकार कार्यकर्त्यांची निवड सभा आयोजित करण्यात आली होती.

        यामध्ये विनोद खोब्रागडे सामाजिक कार्यकर्ते वरोरा यांची चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष पदावर एकमताने निवड करण्यात आली.

               याचबरोबर भारतीय संविधानाची फोटो प्रत,सन्मान चिन्ह,गौरव प्रमाणपत्र आणि माहीतीचा अधिकाराचे पुस्तक देऊन विनोद खोब्रागडे यांचा, “बाप” फाऊंडेशनचे अध्यक्ष लोखंडे सर मुंबई,सेवानिवृत्त डि.वाय.एस.पी.पुरुषोत्तम चौधरी तथा ऍन्टी करप्शन ब्युरो माजी अधिकारी नागपूर,सेवानिवृत्त नायब तहसीलदार लांजेकर भंडारा,श्री.सुरेश दुरुगकर गोंदिया,श्री.विठोबा ध्यानधन नाशिक,श्री.शंकर सलोडकर व इतर पदाधिकारी यांच्या द्वारा सन्मान करण्यत आला.

        लवकरच दुसरी बैठक अमरावती विभाग,संभीजीनगर विभाग आणि मुंबईला होणार आहे.

         माहीतीचा अधिकाराचा कायदा बाबत विनोद खोब्रागडे वरोरा यांच्यासह अनेक मान्यवर मंडळींनी सखोल मार्गदर्शन उपस्थित कार्यकर्त्यांना केले.

                  समाजहितासाठी, देशहीतासाठी, राष्ट्रनिर्मानसाठी, भ्रष्टाचार मुक्त, भारत,महाराष्ट्र,जिल्हा,तालुका,ग्रामपंचायत,करण्यासाठी अनेक सामाजिक संस्था,सामाजिक कार्यकर्ते,यांनी “बाप फाऊंडेशन” मध्ये सहभागी होऊ शकतात असे सार्वजनिक करण्यात आले.