Home Social सीसीआय कडील कापूस खरेदी/विक्री मुदत तात्काळ वाढविण्याची माजी उपसरपंच अशोक चौधरी यांनी...

सीसीआय कडील कापूस खरेदी/विक्री मुदत तात्काळ वाढविण्याची माजी उपसरपंच अशोक चौधरी यांनी केली मागणी..‌‌

शुभम गजभिये

 विशेष प्रतिनिधी..

      सीसीआय कडील कापूस खरेदी/विक्री मुदत तात्काळ वाढविण्याची मागणी चंद्रपूर जिल्हातंर्गत चिमूर तालुक्यातील मौजा शंकरपूर येथील माजी उपसरपंच अशोक चौधरी यांनी सीसीआय प्रशासनाकडे केली आहे.

       त्यांनी पत्रात नमूद केले आहे की,ग्रामपंचायत शंकरपूर तसेच परिसरातील सर्व कापूस उत्पादक शेतकरी बांधवांच्या वतीने कळविण्यात येते की,यावर्षी विविध कारणांमुळे अनेक शेतकऱ्यांचा कापूस अद्यापही विक्रीस गेलेला नाही.

         बाजारातील अनिश्चितता, वाहतूक व नोंदणी प्रक्रियेमधील अडचणी,तसेच अचानक येणाऱ्या तांत्रिक अडथळ्यांमुळे अनेक शेतकरी सध्याच्या मुदतीत कापूस विक्री करू शकलेले नाहीत.

           सध्या Cotton Corporation of India (सीसीआय) मार्फत सुरू असलेल्या कापूस खरेदी/विक्री प्रक्रियेची अंतिम मुदत निकट आली असून,अनेक शेतकऱ्यांकडे अजूनही मोठ्या प्रमाणात कापूस साठा उपलब्ध आहे. 

        ही परिस्थिती लक्षात घेता, शेतकरी बांधवांचे आर्थिक हित जपण्यासाठी सीसीआय कडील कापूस खरेदी/विक्रीस किमान एप्रिल महिन्यापर्यंत मुदतवाढ देण्यात यावी,अशी महत्त्वपूर्ण मागणी त्यांनी केली आहे.

         मुदतवाढ न दिल्यास अनेक शेतकऱ्यांना कमी दराने खासगी बाजारात कापूस विकण्याची वेळ येऊ शकते,ज्यामुळे त्यांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. 

        शासनाने शेतकऱ्यांच्या अडचणींची दखल घेऊन सकारात्मक निर्णय घ्यावा व तात्काळ अधिकृत अधिसूचना जाहीर करावी,अशी नम्र विनंती अशोक चौधरी यांनी केली आहे.

          शेतकरी हित लक्षात घेता संबंधित मंत्रालय व सीसीआय प्रशासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करून मुदतवाढ जाहीर करावी,अशी अपेक्षा माजी उपसरपंच अशोक चौधरी यांनी व्यक्त करण्यात येत आहे.