Home Social रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा… —...

रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा… — पुयारदंड येथे वारकरी दिंडी व कीर्तनाचा कार्यक्रम आनंदमय वातावरणात संपन्न…

शुभम गजभिये

 विशेष प्रतिनिधी..

      चिमूर तालुक्यातील पुयारदंड येथे हिंदवी स्वराज्याचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने ह.भ.प.श्रुतीताई चौधरी यांच्या किर्तनाचा व वारकरी दिंडीचा कार्यक्रम आनंदमय वातावरणात पार पडलाय. 

        यावेळी रांगोळी स्पर्धा,सामान्यज्ञान परीक्षा घेण्यात आली असून अनेकांनी यात सहभाग नोंदविला. दुपारी ४:०० वाजताच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, याप्रसंगी सर्व गावकरी उपस्थिती होते. 

              राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी माहिती देताना १६ व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव ‘जाणते राजे’ होते की त्यांच्या राज्यातील प्रजा सुखी व समृद्ध होती,शेती हे केवळ उपजीविकेचे साधन नसून,रयतेच्या उत्पन्नाचे स्रोत आहे. 

         शेती पिकली तर रयत सुखी,रयत सुखी तर राजा सुखी’ हे सूत्र महाराजांना समजले होते.त्यामुळे महाराजांचा शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन रयतेला मजबुती देणारा होता.

                म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज ‘शेतकरी हितकर्ते राजे’ होते.छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये शौर्य,धैर्य,सकारात्मकता,मुत्सद्देगिरी,युद्धनीती,दूरदृष्टी,व्यावहारिकता आणि चातुर्य असे अनेक गुण होते. 

         छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात सर्व धर्माचे,पंथांचे,जातीचे मावळे होते.जातीधर्माच्या मर्यादा ओलांडून स्वराज्यात सर्वांना शिवाजी महाराजांनी सामावून घेतले.त्यांचे विचार प्रत्येकाने आत्मसात करावे,अशा शब्दात मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचं स्मरण करून त्यांना अभिवादन केलं.

               कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मगेश बल्की यांनी केले व आभार अभिषेक गावडे यांनी मानले.याप्रसंगी कार्यक्रमाला महिला मंडळ पुयारदंड,शालेय विद्यार्थी,गावातील नागरिक उपस्थित होते.