बाळासाहेब सुतार
निरा नरसिंहपूर प्रतिनिधी
पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथील ज्येष्ठ नागरिक कैलासवासी रामचंद्र भगवान लावंड यांच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे. निधनाची वार्ता समजताच कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचे चिरंजीव पंचायत समिती सदस्य श्रीराज भरणे यांनी कैलासवासी रामचंद्र लावंड कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
यावेळी बोलताना श्रीराज भरणे म्हणाले की, रामचंद्र भगवान लावंड हे शांत, संयमी आणि समाजीक व्यक्तिमत्त्व होते. गावातील सामाजिक व धार्मिक उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असायचा. त्यांच्या जाण्याने गावातील एक प्रतिष्ठित आसी व्यक्ती गमावलेली आहे. श्रीराज भरणे हे लावंड कुटुंबीयांच्या सांत्वन भेटी प्रसंगी बोलत होते.
भेटीदरम्यान त्यांनी कैलासवासी रामचंद्र लावंड यांच्या आत्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. तसेच लावंड कुटुंबीयांना धीर देत या दुःखद प्रसंगी आपण त्यांच्या पाठीशी कायम उभे आहोत, असा विश्वास दिला.
यावेळी पंचायत समिती सदस्य दादा पाटील मोहिते, उपसरपंच संतोष सुतार, समाधान बोडके, पोपट सुतार, सह गावातील मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.



