प्रिय साथींनो,
नांदेड येथे वरील तारखाना.20 वे विद्रोही साहित्य संमेलन होत आहे.विषमते विरुद्ध समतेचा हा जागर आहे.अभिजन विरुद्ध बहुजनांचा हा संघर्ष आहे.प्रस्थापित साहित्या विरोधी विस्थापितांचे जीवन दर्शन घडविणाऱ्या साहित्याचे आणि साहित्यिकांचे हे संमेलन आहे. श्रोते प्रेक्षक हे पण बहुजनच असणार आहेत, ज्यांना अजूनही स्वातंत्र्य,समानता,न्याय मिळत नाही.हजारो वर्षापासून अभिजन वर्गास आणि जमीनदार भांडवलदारस 100 टक्के आरक्षण आहे.बहुजन म्हणजे ओबीसी,एससी,एस टी,अल्पसंख्य यांची संख्या 85 टक्के असूनही यांना 85 टक्के आरक्षण मिळणे ऐवजी संविधानाने केवळ 50 टक्केच आरक्षण दिले आहे.हा असमतोल म्हणजे अन्यायच आहे.तरी हे 50 टक्के आरक्षणाची अंमलबजावणी होत नाही.आताचे सरकार तर 100 टक्के खाजगीकरणाचे धोरण आखून हे बहुजनांचे आरक्षण हक्क पण हिरावून घेत आहे.
…या पार्श्वभूमीवर हे विद्रोही साहित्य संमेलन महत्त्वपूर्ण आणि निर्णायक होणार आहे.
या संमेलनातील सर्व कवी,कथाकार,लेखक,समीक्षक,पत्रकार,कलाकार,विचारवंत सारे मिळून काही ठराव पास करून म्हणजे बहुजन हितकारी काही निर्णय एकमताने पारित करून शासनाकडे पाठवणार आहेत.
या संमेलनात महाराष्ट्रातून 300 साहित्यिक,कलाकार आणि 2000 कार्यकर्ते तसेच नांदेड व जिल्ह्यातून 3000 असे एकूण 5000 बहुजन हजेरी लावणार आहेत.
या संमेलनात शाहिरी जलसा,एकपात्री नाटक, रॅप साँग,प्रकट मुलाखत,परिसंवाद,गटचर्चा,कवी संमेलन,युवकांसाठी वादविवाद स्पर्धा,काव्य गायन,अभिनय,नृत्य असे भरगच्च कार्यक्रमाची रेलचेल आहे.यासाठी विविध स्टेज,पेंडोल,असणार आहेत. ज्यांना ज्या विषयात रुची आहे,त्या पेंडोल मध्ये जाऊन बसायचे आहे.
या विद्रोही साहित्य संमेलनात 25 ग्रंथ विक्री व प्रदर्शनाचे स्टॉल,विविध विषयावरची पोस्टर प्रदर्शने,शिल्पकला चे पण काही स्टॉल राहणार आहेत.कूपन घेणाऱ्यांना जेवणाची पण व्यवस्था आहे.स्टेज समिती,पेंडोल समिती,निधी संकलन समिती, निमंत्रण समिती,कार्यक्रम निवड समिती अशा अनेक समित्या दोन महिन्या पासून कामाला लागल्या आहेत,जय्यत तय्यारी झाली आहे.आता फक्त तुमची वाट पाहणे चालले आहे.
तरी अशा ह्या ऐतिहासिक वैशिष्ट्यपूर्ण अभूतपूर्व आणि नांदेडवासीयना जन्माची एक आठवण ठरणाऱ्या या संमेलनासाठी वरील तीन तारखा राखून ठेवाव्यात,या तारखाना कोणतीही कामे कार्यक्रम घेऊ नये.दैनंदिन सर्व कामे बाजूला सारून या संमेलनास हजेरी लावावी.आपला सहभाग नोंदवावा,आपणही या संमेलनाचे साक्षीदार व्हावे.आपली उपस्थिती ही परिवर्तनास पूरक ठरणार आहे.


