Home देशविदेश राष्ट्रपिता ज्योतिबा फुलेंचे स्वप्न साकार करू या…

राष्ट्रपिता ज्योतिबा फुलेंचे स्वप्न साकार करू या…

     पाच हजार वर्षांपूर्वी आपला भारत देश हा एक संघ भारत होता, आपल्या देशात वर्णव्यवस्था आणि जातीव्यवस्था अस्तित्वात नव्हती. परंतु या देशातील काही मूठभर कुबुद्धि आणि दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांनी आपला स्वार्थ साधण्यासाठी आणि आईत खाऊ ऐशरामी जीवन जगण्यासाठी, आपले वर्चस्व निर्माण करण्यासाठी वर्णव्यवस्था निर्माण करून एकसंघ भारताचे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र आणि अति शूद्र असे पाच तुकडे केले, एकसंघ भारताचे पाच तुकडे करूनही यांची समाधान झाले नाही म्हणून यांनी अडीच हजार वर्षांपूर्वी जातीव्यवस्था प्रस्थापित केली, मनुस्मृतीचा कायदा या देशाला लागू करण्यात आला. आणि एकसंघ भारताचे साडेसहा हजार जातीच्या तुकड्यात विभाजन केले, नुसते विभाजन करूनच थांबले नाहीत तर जातीव्यवस्थेची साडेसहा हजार मजल्याची एक इमारत निर्माण केली, अशी इमारत की ज्या इमारतीला पायऱ्या नाहीत किंवा शिडी नाही किंवा लिफ्ट नाही, म्हणजेच खालच्या मजल्यावरच्या व्यक्तीला वरच्या मजल्यात जाता येऊ नये आणि वरच्या मजल्यावरच्या व्यक्तीला खालच्या मोजल्यात जाता येऊ नये, अशी गैरसोय असलेली त्रासदायक जातीव्यवस्थेची इमारत तयार केली, यास जातीची उतरण पण म्हणतात. जातीयतेच्या या व्यवस्थेत ब्राह्मण क्षत्रिय वैश्य हा अभिजनवर्ग म्हणजे प्रस्थापित वर्ग हा पंधरा टक्के वर्ग आणि शूद्र व अतिशूद्र अति शुद्ध म्हणजे अस्पृश्य ज्यात दलित आणि स्त्रिया यांचा समावेश होतो, या अतिशुद्र वर्णाला केवळ वरच्या जातीची फक्त घाणेरडी कामे करायची आणि सेवा करायची हे काम दिले. आणि ओबीसी प्रवर्गातील जातींना केवळ उत्पादन क्षेत्राचे काम दिले, सेवा क्षेत्रातील जातीच्या लोकांनी केवळ वर्षांची सेवा करायची आणि उत्पादन क्षेत्रातील जातीच्या लोकांनी केवळ अन्नधान्य आणि वस्तू निर्मितीची म्हणजे कष्टाची कामे करून उत्पादन करायचे परंतु या उत्पादित वस्तूवर मात्र हक्क त्यांचा नसून त्यावर केवळ ब्राह्मण क्षत्रिय वैशांचाच हक्क असणार असे कायदे करण्यात आले.15 टक्के अभिजन यांना सर्व सोयी सवलती अधिकारी आणि हक्क देण्यात आला आणि 85 टक्के असलेला बहुजन या वर्गास शूद्र ठरवून म्हणजे निच अपवित्र ठरवून त्यांचे सर्व मानवी आणि नैसर्गिक हक्क हिरावून घेण्यात आले, हे केवळ तलवारीच्या,बाणाच्या ,सत्तेच्या जोरावर.बहुजनांना शिक्षण,संपती,प्रतिष्ठा,सत्ता या पासून दूर ठेवले,यामुळे हा श्रमिक कष्टकरी वर्ग विस्थापित झाला.आणि ऐतखाऊ वर्ग म्हणजे सेवा उत्पादनाचे काम न करणारा 15 टक्के वर्ग हा प्रस्थापित झाला.

     हा प्रस्थापित वर्ग विस्थापित वर्गाचा केवळ हक्क हिरा ऊनच गप्प बसला नाही,तर या मूठभर अल्पजन वर्गाने सत्तेच्या जोरावर हे 15 टक्के प्रस्थापित 85 टक्के विस्थापित ( हक्क नाकारल्या गेलेले ) बहुजन लोकांची पिळवणूक,छळवणूक,अन्याय,अत्याचार ,दुराचार,व्यभिचार करणे असे वर्तन सुरू केले,ते 2500 वर्षापासून कमी जास्त प्रमाणात अजूनही चालूच आहे.

    प्रस्थापित विरुद्ध विस्थापित,अभिजन,गर्भश्रीमंतांच्या विरोधी बहुजन गरिबांचा संघर्ष लढा चालूच आहे, जो पर्यंत स्वातंत्र्य समता बंधुभाव न्याय समाजवादी व्यवस्था निर्माण होणार नाही, तो पर्यंत प्रस्थापित विरोधी विस्थापित अशी लढाई चालूच राहणार आहे.भारताचा इतिहास म्हणजेच क्रांती प्रतिक्रांती क्रांतीचा इतिहास आहे,असे बाबासाहेब म्हणतात.आणि जगाचा इतिहास म्हणजे वर्गसंघर्षाचा इतिहास आहे असे कार्लमार्कस म्हणतात. वर्गसंघर्षाचा आणि जातीसंघर्षाचा इतिहास म्हणजेच प्रस्थापित समाजाच्या व्यवस्थेच्या विरोधी विस्थापित समाज आणि व्यवस्थेचा हा लढा,संघर्ष,लढाई आहे,वैचारिक पातळीवरची आणि सत्ता आणि संपती च्या वाटणीची,आणि प्रतिष्ठा मिळण्यासाठीची ही लढाई आहे.या लढाईत बहुजन समाज,गरीब वर्ग,मध्यम वर्ग एक होऊन ही अस्तित्वाची आणि अस्मितेची लढाई अडीच हजार वर्षापासून एकत्र लढताहेत.बाबासाहेबांच्या संविधानामुळे ही लढाई लढणे बहुजनास सोपे झाले आहे.कारण कायदे आपल्या बाजूने आहेत.1952 पूर्वी हे कायदे 15 टक्के अभिजन जाती आणि श्रीमंतांच्या बाजूचे होते, हे मनूचे कायदे होते,मनुस्मृतीचे दहन करून बाबासाहेबांनी संविधान दिले,या संविधानानुसार बहुजनांचा स्वातंत्र्य समता बंधुता न्याय हा मानवी हक्क मिळाला.1914 ला एक मोठे संकट आले, धोक्याने चोरपावलाने म्हणजेच लोकशाही मार्गानेच पण मतदानात घोटाळा करून परत मनुवाद्यानी सत्ता बळकावली.यामुळे विषमतेविरुद्ध समतेची ही बहुजनांची लढाई अधिक तीव्र करण्याची गरज आहे.

      या लढाईचाच एक भाग म्हणजे विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे हे नांदेड येथे होत असलेले 20 वे विद्रोही साहित्य संमेलन होय. 

   यासाठी महाराष्ट्रातून अडीशे ते तीनशे कवी लेखक साहित्यकार विचारवंत कलाकार सहभागी होणार आहेत, दोन हजार लोक बाहेरून येणार आहेत, नांदेड आणि नांदेड परिसरातील पाच हजार लोक दररोज या संमेलनाचा लाभ घेणार आहेत, बाहेरून येणाऱ्या लोकांची राहण्याची जेवणाची व्यवस्था तसेच या संमेलनासाठी लागणारे सर्व स्टेज अनेक पेंडॉल्स पुस्तक प्रदर्शनाचे स्टॉल्स, विविध कला शिल्प यांचे स्टॉल यासाठी वीस लाखाच्या वर खर्च येणार आहे, हा खर्च प्रस्थापित आणि आपल्या विरोधी विचारांच्या व्यक्ती संस्था संघटना पक्ष यांचेकडून घ्यायचे नाही सरकारची पण मदत घ्यायची नाही असा नियम या विद्रोही साहित्य संमेलनाचा आहे, तसेच कुण्या श्रीमंत अशा एखाद्या उद्योगपतीकडूनही मोठी रक्कम घ्यायचं नाही असा पण नियम आहे, थोडक्यात, पुरोगामी विचारांच्या जनते मधूनच निधी जमा करून हे संमेलन यशस्वी करायचे आहे. 

      यासाठी तन मन आणि धन अशा तिन्ही स्वरूपाची मदत करणारे किंवा यापैकी त्यांना जे जमते ती मदत मिळण्याची अपेक्षा या संमेलनाच्या संयोजन समितीने व्यक्त केली आहे.

   तरी आपण आपल्या कुवतीनुसार खालील बँकखात्यात आपली रक्कम जमा करावी.आणि राष्ट्रपिता ज्योतिबा फुले यांचे हे स्वप्न होते,ते साकार करू या.

     त्यांनी त्यांच्या वेळी जे साहित्य संमेलन भरायचे त्या साहित्य संमेलनाचे निमंत्रण फुलेंना आले,त्या वेळी त्यास नकार दिला,त्यावेळच्या ग्रन्थ सभेस लिहिलेले पत्र ( नांदेड आय टी आय पॉईंट फुले स्मारक येथे या पत्राचे फलक लावले आहे,ते आपण जरूर वाचावे ) त्या वेळचे साहित्य संमेलन अजूनही अखिल भारतीय साहित्य संमेलन म्हणून दरवर्षी शासकीय मदतीने भरत असते. हे संमेलन प्रस्थापितांच्या साहित्याचे आणि प्रस्थापित समाजाचे हित जपणारे आहे,या साहित्यात विस्थापितांचे चित्र आणि जीवन दर्शन नसते,म्हणून आमचा बहुजन समाज शिकून सावरून जेंव्हा साहित्य निर्माण करील,ज्या साहित्यात विद्रोह असेल,असे बहुजन समाजाचे विस्थापितांचे प्रस्थापिता विरोधीचे विद्रोही साहित्य संमेलने होतील,आम्ही विद्रोही तुमच्या प्रस्थापित साहित्य संमेलनास येणार नाही.आम्ही आमचे स्वतंत्र साहित्य संमेलन घेऊ.” असा मानस किंवा स्वप्न फुलेंनी पहिले होते,त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यात आपले हित दडले आहे.ते जोपासणे साठीच हे संमेलन आहे.तुकाराम महाराजांनी आपणास सजग केले आहे.” आपुलिया हिता,जो असे जागता, धन्य मातापिता तयाची या “.

   चला तर मग दिनांक 28 फेब्रुवारी आणि 1 मार्च रोजी होत असलेल्या सायन्स कॉलेज मैदानावरील विद्रोही साहित्य संमेलनात आर्थिक सहभागासह सामील होऊ या. 

  निवेदक : दत्ताभाऊ तुमवाड

      सत्यशोधक समाज नांदेड

दिनांक : 18 फेब्रु.2026.फोन : 9420912209.