रामदास ठुसे
नागपूर विभागीय प्रतिनिधी
चिमूर शहरातील खाऊ गल्लीत दुकाने उपलब्ध करण्यासाठी तथा सुजाव घेण्यासंदर्भात आढावा बैठक सकाळी घेण्यात आली होती. उपरोक्त बैठकीत व्यवसायिक व्यापारी नागरिकांची मते जाणून घेण्यात आली. नगरपरिषदेचे ठरवून दिलेल्या करार प्रमाणे गाडे आणि रुम ईश्वर चिठ्ठीने सर्वांना देण्याचा निर्णय घेण्यात आला.
सोई सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तसेच प्रशासकीय कामास काही खर्च येत असल्याने रुम व गाडे देताना शुल्क आकारले जाणार असल्याचे सांगितले ते शुल्क सर्वानुमते मान्य केले. बैठकीत आमदार महोदयांनी ठरल्याप्रमाणे नगर परिषद प्रशासनाला सुचना देण्यात आली. व त्वरित सर्व प्रकिया पूर्ण करण्याचे सुचविले होते. आज त्या कामाचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात नगरपालिका चिमुर यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.
चिमुर शहरातील भाजीपाला मार्केट व खाऊ गल्ली स्वरूपात व्यवसायिक व्यापारी वर्गाला आज हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देत असल्याचा आनंद होत असल्याचे सांगितले. या व्यवसायिकांना आपला भाजीपाला रस्त्यावर विकावा लागत होता आज ते या ओट्यावर किंवा रुम मध्ये ठेवून विक्रीसाठी ठेवू शकतात हे आपल्या हक्काचे घर असल्याचे सांगितले.
याठिकाणी मोठ्या प्रमाणात ओटे रुम उपलब्ध करून देण्यात आले असून उर्वरित व्यवसायिकांना त्या त्या स्वरूपात जागा नगर पालिकाच्या माध्यमातून उपलब्ध करून देऊ हे ही सांगितले.
आज कुणालाही रस्त्यावर आपला माल विकावा लागणार नाही आणि वाहतूकीला त्रास होणार नाही. चिमुर शहराला स्वच्छ आणि सुदंर बनविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असुन त्याच्या दुष्टिने कार्य करीत आहोत असे सांगितले.
या बैठकीला प्रामुख्याने चिमुर शहरातील नगराध्यक्षा सौ. गिताताई लिंगायत मँडम, उपनगराध्यक्ष श्री. संजयजी नवघडे, नगर परिषद मुख्याधिकारी सौ. अर्चना वंजारी मँडम, सभापती नगर परिषद चिमुर तथा नगरसेवक आदिंसह गावातील आजी माजी लोकप्रतिनिधी व नागरिक, व्यावसायिक व्यापारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



