रामदास ठुसे
नागपूर विभागीय प्रतिनिधी
चिमूर तालुक्यातील नवतळा येथे आयोजित महर्षी वाल्मिकी लोकार्पण सोहळा कार्यक्रमानिमित्त आमदार महोदयांनी उपस्थिती दर्शविली. महान ऋषी महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करून मनोभावे दर्शन घेतले. दरम्यान उपस्थित नागरिकांनी स्वागत करून शाल-श्रीफळ शिड भेट देऊन सत्कार केला.
या कार्यक्रमा प्रसंगी विशेष म्हणजे ढिवर समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी होऊन मुख्य रस्त्यापासून लेझिम वाजत पुष्पाचा वर्षावर करित सर्वाचे स्वागत केले.
यामुळे कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सगळ्याच नागरिकांमध्ये उत्साह निर्माण झाला. उपरोक्त कार्यक्रम प्रसंगी अनेक मान्यवरांनी संमोचित मनोगत व्यक्त केले. यावेळी आमदार महोदयांनी या गावाच्या तथा समाजाच्या सर्वागीण कटिबद्ध असल्याचे सांगत शासनाच्या वतीने जी मदत करता येईल ती करण्यास सदैव तत्पर असल्याचे म्हटले.
महाराष्ट्र सरकारने या समाजाच्या विकासासाठी समाजा करिता नवीन सतरा योजना सुरू करून राबविण्यात येत असल्याचे सांगितले. समाजाने सामाजिक सभागृहाची मागणी केली होती त्याअनुषंगाने त्याला तिस लक्ष रुपये मंजूर करून सामाजिक सभागृह हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. त्यानंतर याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात समाजाचे कार्यक्रम व्हावेत म्हणून एक कोटी रुपयांचे वाल कम्पाऊन्ड बांधकाम करण्यात आले आहे. यापुढेही समाजाच्या वतीने मागणी असल्यास त्याची पुर्तता करेल असे आश्वासित केले.
यावेळी प्रामुख्याने श्री. प्रकाशजी डायरे साहेब, श्री. भुरे महाराज, श्री. राजूभाऊ देवतळे राज्य परिषद सदस्य, श्री घनश्यामभाऊ डुकरे बाजार समिती राज्य परिषद सदस्य, श्री. मनिष तुंम्पल्लीवार भाजपा मंडल अध्यक्ष, डॉ. दिलिपजी शिवरकर माजी अध्यक्ष भाजपा तथा ज्येष्ठ नेते भाजपा तालुका समन्वयक श्री.राजुभाऊ झाडे, श्री. महादेवभाऊ कोकाटे, श्री. विजयजी मेश्राम, श्री. विजयजी नाने, श्री. अखबर रामटेके, श्री. राजेंद्रजी शिवरकर, श्री. दिवाकरजी डायरे, श्री. शरदजी गिरडे आदी मान्यवर पदाधिकारी तथा भाजपा पदाधिकारी तथा कार्यकर्ते आणि समाज बांधव माता भगिनी नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.



