बोली भाषेत छेद हा शब्द भौतिक वस्तू किंवा गोष्टीसाठी वापरल्या जातो, आणि भेद हा शब्द आदिभौतिक गोष्टीसाठी वापरल्या जातो. उदा.लाकडाला,भिंतीला,कागदाला छेद गेला.तसेच जाती धर्म कर्म यासाठी ‘ भेद ‘ हा शब्द वापरल्या जातो. याचा अर्थ छेद हा वस्तूशी संबंधित शब्द आहे, तर भेद हा भावाशी म्हणजे भावनेशी संबंधित शब्द आहे, हे समजणे गरजेचे आहे.
म्हणजेच छेद हा शब्द एका वस्तूचे दोन तीन किंवा त्यापेक्षा अनेक तुकडे करण्यासाठी वापरला जातो, आणि भेद हा शब्द एकाचे दोन किंवा तीन किंवा अनेक विभाग करण्यासाठी तर वापरल्या जातोच पण त्याचबरोबर अनेक भाग करून त्यात दुरावा किंवा विषमता निर्माण करण्यासाठी भेद हा शब्द वापरला जातो. किंवा भेद हा शब्द, भेदभाव ‘असा बनतो.
छेद हा गणिती शब्द आहे आणि तो संख्यात्मक आहे, तो भौतिक आहे. आणि भेद हा शब्द सामाजिक आहे मानसिक आहे बौद्धिक आहे, हा पण संख्यात्मक आहे, परंतु एका शब्दाचा हा संख्यात्मक शब्द आहे. आणि शंकात्मक शब्द आहे, कारण माणसाच्या मनात जेव्हा शंका निर्माण होते, तेव्हाच भेद भाव निर्माण होतो. आणि या भावातून दृष्टी बदलते, जिथे येत आहे तिथे दोन किंवा अनेक दिसायला लागतात, यास दृष्टीदोष म्हणतात. विचारात पण बदल होतो, एक विचारात चे जेव्हा अनेक विचार निर्माण होतात त्यास द्वैत किंवा अनेक वाद म्हणतात. एकाचे अनेक अनेक व्हावेसे वाटते किंवा तसा भाव निर्माण होतो तेव्हा दृष्टी बदलते, आधी विचार बदलतात मग नंतर भावना बदलतात एक विचार एक भावना जेव्हा दोन किंवा अधिक स्वरूप धारण करतात तेव्हा एकच वाचा सिद्धांत नष्ट होऊन अनेक तत्त्वाचा सिद्धांत आणि त्यातून द्वेत अद्वैत भावना आणि भाव निर्माण होतात,
म्हणजेच आधी विचार नंतर भावना आणि नंतर कृती याप्रमाणे व्यवहार सुरू होतो, आणि यातील सर्वांना दुःख आणि त्रास देणारी गोष्ट ही की,’ भेदभावचे वर्तन ‘. यामुळे अनेक भौतिक सामाजिक आर्थिक राजकीय धार्मिक सांस्कृतिक भेदभाव निर्माण होतात, भेदभावाचे वर्तन केले जाते, त्यातूनच भांडणे मारामाऱ्या संघर्ष हिंसा निर्माण होते. केवळ छेद आणि भेद याबद्दलची विकृत व्याख्या किंवा समज आणि भाव यामुळेच असे घडते.
माणसात विकृत भाव का निर्माण होतो ? याच्यात विकृत भाव निर्माण होतो, तू का होतो ? त्याची कारणे काय ? आणि ज्याच्यात संस्कृत भाव निर्माण होतात, ते का होतात ? त्याची कारणे काय ? त्याचा शोध घेणे जरुरीचे आहे.
या प्रश्नांचे उत्तर शोधल्यानंतर असे दिसेल की, प्रत्येक माणसात निसर्गतःच चांगले आणि वाईट गुण आहेत, विकृती आणि संस्कृतीचे विचार आहेत, सद्गुण आणि दुर्गुण आहेत, म्हणजेच माणसातील गुणधर्माचा जर अभ्यास केल्यास असे आढळून येईल की, त्यात सद्गुणाचे बीज आणि दुर्गुणाची बीज पण अस्तित्वात आहेत, मग असे असेल तर, काही माणसे सदगुणी तर काही माणसे दुर्गुणी असे का निपजतात ? याचे उत्तर असे की, बीज उपजण्यासाठी जमीन पाहिजे, पाणी पाहिजे, वातावरण पाहिजे, म्हणजेच ऋतू पाहिजेत, म्हणजेच वेळ काळ आणि परिस्थिती नुसार बीजाचे अंकुरण होत असते, आणि त्यानुसार त्याची वाढ पण होत असते, त्यानुसार त्याचे झाडात पण रूपांतर होत असते, आणि जशी भी आणि ज्याची बी त्याचीच फळे त्या झाडाला लागणार, यात वाद नाही. या सिद्धांतानुसार जमीन पाणी हवा ऋतू म्हणजेच वातावरण म्हणजेच भौतिक परिस्थिती नुसार बियाची रुजवण आणि वाढ होत असते, आणि त्याचे वृक्षात रूपांतर होऊन त्यास तीच फळे लागतात, सद्गुणाची बी असेल तर त्यास सद्गुनीच फळे लागणार, आणि दुर्गुणाची बी असेल तर त्या दुर्गुणाचेच फळे लागणार. यात वाद नाही, परंतु भौतिक वातावरण संस्कृतीचे असेल तर त्यात सद्गुणाचे म्हणजेच सद्गुनी बियांची रुजवण होणार, आणि विकृतीचे जर वातावरण असेल तर अशा वातावरणात दुर्गुणी बियाचेच रुजवण होणार हे निर्विवाद असावे. म्हणजेच जर विषमतावादी व्यवस्था असेल तर अशा व्यवस्थेत दुर्गुणी विचारच पेरले जाणार आणि त्यांचेच झाड उगवणार यात शंका नाही, तसेच समतावादी व्यवस्था असेल तर अशा व्यवस्थेत म्हणजेच वातावरणात सदगुणा सद्गुण या बीजांचीच पेरणी होणार किंवा माणसातील सदगुणांनाच संधी मिळणार आणि त्यांचीच रुजवण आणि वाढ होणार आणि सदगुणांचीच फळे लागणार यात सुद्धा वाद असण्याची कारणे नसावीत.
छेद हा शब्द भौतिक आहे आणि भेद हा शब्द मानसिक आहे त्यामुळे भेद हा विचारातून आणि भावनेतून तयार होत असतो, विचार आणि भावना यास जसे वातावरण मिळेल त्यानुसार ते घडत असतात, विचार आणि भावना पाण्यासारख्या असतात, पाण्याला जसे चढउताराचे आणि वाकडेतिकडे किंवा सरळ रस्ता मिळेल तसे ते धावत पळत असते, थांबणे हा त्याचा गुण नसतो, पाणी हे प्रवाही असते, पाण्याचा प्रवाह थांबत नाही, त्यास बांध घालून अडविले तरी तो बांध भरल्यानंतर ओव्हर फ्लो होऊन तो प्रवाह पुढे जातो हा त्याचा गुणधर्म असल्यामुळे, प्रवास बांजरी घातला, धरम जरी बांधले तरी त्या धरणाला काही गेट ठेवावेच लागतात, हे माणसाला माहीत असूनही माणूस बुद्धी आणि भावनेचा प्रवाह अडविण्याचा प्रयत्न करतात, त्यांचे स्वातंत्र्यावर गदा आणतात, इथेच माणसाची चूक होते, आणि या चुकीचे अनेक दुष्परिणाम माणूस आणि समाज आणि देश भोगत असतो.


