” सुमारे पाऊणेचार हजार वर्षांपूर्वी नाग, द्रविड, अज, यक्षु, शिग्रू आणि पणी या सहा वंशाची भारतीय प्राचीन सिंधु संस्कृती होती, जी 100% लोकशाहीप्रधान संस्कृती हजारो वर्षांपासून नांदत होती. त्याच समकालीन ग्रीक मध्ये सुद्धा ग्रीक संस्कृती नांदत होती.”
अशा निसर्गनियमावर आधारित असलेल्या मानवतावादी सूसंस्कृतीवर, जगात अन्यत्र कुठेतरी जन्मलेल्या, ज्यांच्या कुसंस्कृतीला स्वतःचा कुठलाही देश नव्हता आणि नाही. अशा निसर्ग नियम विरोधी असलेल्या, मानवतावादाविरोधी असलेल्या साम, दाम, दंड आणि भेदाच्या कूटनितीवर आधारित असलेल्या षडयंत्रकारी कुसंस्कृतीचे आक्रमण पाऊणेचार हजार वर्षांपूर्वी भारतावर आणि ग्रीक देशावर झाले.
हे आक्रमण म्हणजे निसर्गनियमांच्या अर्थात स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या लोकशाही मूल्यांच्या विरोधात झालेली पहिली प्रतीक्रांती होती.
या प्रतीक्रांतीने माणसा – माणसात भेद निर्माण केले. यांनी माणसांनाच काय मुक्या प्राण्यांनाही आपले गुलाम बनवले. अंधश्रद्धा आणि कर्मकांडाच्या माध्यमातून यांनी आपला नंगानाच शेकडो वर्ष चालवला. अती तिथे माती या उक्तीप्रमाणे यांनाही तथागत भगवान बुद्धाच्या धम्माच्या निर्मितीतुन शह मिळाला.
आणि प्रथमच या प्रतीक्रांतीला धम्म क्रांतीतून आव्हान मिळाले. हे आव्हान या कुटनितीला एवढे जहरी बोचले की त्यांनी क्रांतीला शह देण्याची बौद्धिक शक्ती जवळ नसल्याने त्यांनी क्रांतिकारकानाच शरीराने संपविण्याचा विडा उचलला.
इथूनच पुढे क्रांती आणि प्रतीक्रांतीच्या सांस्कृतिक लढाईला खरी सुरुवात झाली. यामध्ये पुढे क्रांतीला अर्थात धम्मक्रांतीला पुन्हा उजाळा देण्याचे काम सम्राट अशोक आणि सम्राट हर्षवर्धन यांनी त्यांच्या कार्यकाळात राजाश्रय देऊन केली.
यानंतर मात्र पुन्हा सम्राट हर्षवर्धनाचा पुत्र ब्रहद्रथ यांच्या कार्यकाळात त्यांचा सेनापती पुष्यमित्र शुंगाने या धम्मक्रांतीवर अर्थात क्रांतीवर पुन्हा प्रतीक्रांती केली. या ठिकाणी त्याने ब्रहद्ररथाची हत्या केली. पुढे इथे क्रांतीचे दूत असलेल्या भिखूनाच संपवण्याचे काम या पुष्यमित्र शुंगाने केले ( विचाराची लढाई लढता येत नाही म्हणून विचारवंतांनाच संपवण्याचे काम या षंढ आणि नेभळट ब्राम्हण्यवृतीने केले). त्याने तर एका भिखूचे मुंडके आणणाऱ्यांना सोन्याच्या 100 मुद्रा बक्षीस देण्याचे फर्मानच काढले होते.
अशा रीतीने पुन्हा एकदा क्रांतीवर प्रतीक्रांतीची लाट स्वार झाली होती.
ही प्रतीक्रांतीची लाट सुमारे चौदाशे वर्षे कायम टिकून राहिली. या काळात हे आक्रमण राजकीय स्वरूपाचे जरी नसले तरी, कुसांस्कृतिक आक्रमण म्हणून मात्र कायमचा ठसा उमटवला. मधल्या काळात मोगल मुस्लिम आक्रमणे आली, अनेक समाजसुधारकांनी या कुसांस्कृतिक आक्रमणाला शह देण्याचा प्रयत्न केला. अनेक संतांनी समाजप्रबोधनातुन प्रयत्न केले. परंतू या आर्याच्या कुटनीतीचा बुरुज कांही ढासळला नाही. कमीजास्त कायम टिकून होता.
पुढे म. फुले आणि सावित्रीबाई फुले या दाम्पत्यांनी मात्र शूद्राना व स्त्रियांना शिक्षण देण्याचा निर्णय घेऊनच नव्हे तर 1848 मध्ये पहिली मुलींची शाळा काढून या आर्याचा , ब्राम्हण्यवृतीचा कुसांस्कृतिक मनोरा मुळातून गदागदा हलवला.
आणि पुढे हाच मनोरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताच्या संविधानाची निर्मिती करून मुळासाहित उखडून फेकला…….!


