शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
चिमूर तालुक्यातील जेतवन बुद्ध विहार मालेवाडा येथे दि.७ फेब्रुवारी २०२६ ला त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने सकाळी ९.३० वाजता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांची मिरवणूक गावातील मुख्य रस्त्याने प्रस्थान करत जि.प.शाळा,ग्रा.प,छत्रपती शिवाजी चौक,डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथून मार्गातील सर्व महापुरुषांच्या स्मारकांना अभिवादन करीत बुद्ध विहारात तिची सांगता झाली.
कार्यक्रमाची सुरुवात तथागतांच्या मूर्तीला,क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले,क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले,डॉ.बाबासाहेब आंबेडकर, त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेला दीप प्रज्वलन व पुष्पमाला अर्पण करुन करण्यात आली.
त्यानंतर मान्यवरांनी मार्गदर्शन केले.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्रा.प्रणाली टेंभुर्णे व गु.से.मं.चे श्री.चरणदासजी पोईनकर यांनी त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षमय जीवनाला खऱ्या अर्थाने खंबीरपणे साथ देणाऱ्या,बाबासाहेबांना घडविणाऱ्या त्यांच्या पत्नी माता रमाई यांनी प्रचंड हाल अपेष्टा सहन करुन बाबासाहेबांच्या कुटुंबाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली.
या मातेने आपल्या इच्छा – आकांक्षाना मूठमाती देऊन बाबासाहेबांना समाजहीतासाठी लढण्यास प्रोत्साहित केले.
माता रमाई बाबासाहेबांच्या आयुष्यात आल्या नसत्या तर एवढ्या प्रचंड विद्वतेचा निस्वार्थ नेता कधीच घडला नसता,अशा शब्दात मान्यवरांनी त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या कार्याचं स्मरण करून त्यांना अभिवादन केलं.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.मंगला धारणे,प्रा. डॉ.संदीप सातव,प्रा.डॉ.बिजनकुमार शील,श्रीरामजी खाडे,जि.प. शाळेचे मुख्याध्यापक गुलाब पंधरे सर व इतर मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्या रामटेके यांनी केले.आभार मीनाक्षी गजभिये यांनी मानले.कार्यक्रमाला बौध्द पंच कमेटी,भीमज्योती महिला मंडळ,ग्राम पंचायत पदाधिकारी,शाळेचे शिक्षक – रा.से.यो. स्वयंसेवक,स्वयंसेविका,विद्यार्थी,उपासक – उपासिका,व गावातील नागरिक उपस्थित होते.



