Home आरोग्य मेंढा येथे आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद…

मेंढा येथे आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद…

भाविकदास करमनकर

 धानोरा तालुका प्रतिनिधी 

           मेंढा (लेखा) येथे रसेयो शिबीरा दरम्यान मेंढा येथील नागरिकांना मोफत आरोग्य तपासणी शिबिरास आयोजित करण्यात आले होते याला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या शिबिरात विविध आजारांची तपासणी करून नागरिकांना योग्य वैद्यकीय सल्ला देण्यात आला.

             शिबिरात रक्तदाब, मधुमेह, हिमोग्लोबिन, वजन तसेच सर्वसाधारण आरोग्य तपासण्या करण्यात आल्या. तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने नागरिकांची तपासणी करून आवश्यक त्या औषधांचे वाटपही केले. ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.

                 यावेळी डॉक्टरांनी नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व पटवून देत स्वच्छता, संतुलित आहार आणि व्यायाम याबाबत मार्गदर्शन केले. नागरिकांनी अशा शिबिरांचे आयोजन वारंवार करावे, अशी मागणीही व्यक्त केली.

         कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजक, वैद्यकीय कर्मचारी आणि स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.

           या दरम्यान आय ए एस परीक्षा पास झालेल्या उमेदवारानि अभ्यास दौरा निमित्त मेंढा येथे भेट देऊन गावातील कामकाज कसे चालतात याची पाहणी केली तसेच मेंढा येथे सुरु असलेल्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिरास भेट देऊन विध्यार्थी स्वयंसेवकास स्पर्धा परीक्षा साठी मार्गदर्शन केले यावेळी नायब तहसीलदार देवेंद्र वाळके नयब तहसीलदार बारापात्रे गट विकास अधिकारी वानखेडे स्वयंसेवक व कार्यक्रम अधिकारी व गावकरी उपस्थित होते.