Home Social मेंढा (लेखा) येथे NSS विशेष शिबिराचे उद्घाटन उत्साहात… — राष्ट्रीय सेवा...

मेंढा (लेखा) येथे NSS विशेष शिबिराचे उद्घाटन उत्साहात… — राष्ट्रीय सेवा योजना ही विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी, शिस्त व नेतृत्वगुण निर्माण करणारी प्रभावी चळवळ :- प्राचार्य डॉ.उदय थुल…

भाविकदास करमनकर

  धानोरा तालुका प्रतिनिधी 

श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था गडचिरोली द्वारा संचालित श्री जीवनराव सीताराम पाटील मुनघाटे महाविद्यालय तथा गोंडावाना विद्यापीठ अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने आयोजित विशेष शिबिराचे उद्घाटन दिनांक ९ फेब्रुवारी रोजी मेंढा (लेखा) येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.

         या शिबिराच्या माध्यमातून ग्रामविकास व सामाजिक जाणीव वृद्धिंगत करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

       या उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.उदय थुल तर उद्घाटन श्रीमती नंदा दुगा यांच्या हस्ते झाले व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून देविदास तोफा ग्रामसभा सदस्य गणपत तोफा प्रभुदास तोफा शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अलीराम हीचामी ग्रामसभा अध्यक्ष श्रीमती मरस्कुले मॅडम, मुख्याध्यापक श्रीमती नंदनपवार मॅडम, डॉ.राजू किरमिरे, डॉ.जंबेवार मॅडम, डॉ.प्रियंका पठाडे रासेयो कार्यक्रमाधिकारी इत्यादी मंडळी मंचावर उपस्थित होते.

           कार्यक्रमाची सुरुवात श्री साईबाबा यांच्या प्रतिमेला माल्या अर्पण व दीप प्रज्वलन करून करण्यात आली. “डिजिटल साक्षरता व मतदार जनजागृती साठी युवाशक्ती” या संकल्पनेवर आधारित रासेयो विशेष शिबिराचे या सात दिवशीय शिबिरामध्ये श्रमदान बौद्धिक व प्रबोधनात्मक मनोरंजनाची कार्यक्रम आयोजित केले आहे. 

         विद्यार्थ्यांनो आव्हानाला सामोरे जा व स्वतःला कमी न लेखता आपली प्रगती करा असा तसेच “राष्ट्रीय सेवा योजना ही विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी, शिस्त व नेतृत्वगुण निर्माण करणारी प्रभावी चळवळ आहे. शिक्षणासोबत समाजसेवा ही काळाची गरज आहे.” असे मत प्राचार्य डॉ.उदय थुल यांनी व्यक्त केले.

           सरपंच श्रीमती नंदा दुगा यांनी गावाच्या विकासासाठी NSS स्वयंसेवकांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे सांगत गावकऱ्यांनीही सहकार्य करण्याचे आवाहन केले.

           रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ.पठाडे मॅडम यांनी शिबिरादरम्यान स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, व्यसनमुक्ती जनजागृती, आरोग्य व पर्यावरण विषयक प्रबोधन अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती दिली.

          शिबिराच्या निमित्ताने स्वयंसेवकांनी गावात स्वच्छता व जनजागृतीचा संदेश पोहोचवण्याचा निर्धार व्यक्त केला. ग्रामस्थांनी या उपक्रमाचे स्वागत करत विद्यार्थ्यांच्या सहभागाचे कौतुक केले.

          शिबिराच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे उद्घाटन प्रसंगी डॉ.लांजेवर, डॉ.चुदरी, डॉ.वाघ, डॉ.चव्हाण, डॉ.झाडे, डॉ.धवनकर,डॉ.मुरकुटे,प्रा.तोंडरे, प्रा.बनसोड,डॉ.पुण्यप्रेड्डीवार, प्रा.वाळके,प्रा.खोब्रागडे, प्रा.करमनकर,प्रा.रणदिवे, प्रा. वटक, प्रा.आवारी,प्रा.मांडवगडे, प्रा.भुरसे, प्रा.मीनाक्षी खोब्रागडे,  कायते, मानापुरे,गोहने,लांबट,बोनगीरवार यांच्यासह मेंढा येथील बहुसंख्य ग्रामस्थ व स्वयंसेवक उपस्थित होते.

           कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.प्रियांका पठाडे संचालन, डॉ.प्रवीण गोहणे यांनी तर आभार प्रा.मीनाक्षी खोब्रागडे यांनी मानले.