Home Social बोथली (वाह.)येथे राष्ट्रीय सेवा योजना व ग्रामीण शिबिराची सांगता उत्साहात संपन्न…

बोथली (वाह.)येथे राष्ट्रीय सेवा योजना व ग्रामीण शिबिराची सांगता उत्साहात संपन्न…

     रामदास ठुसे

नागपूर विभागीय प्रतिनिधी

        आठवले समाजकार्य महाविद्यालय चिमूर च्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) व ग्रामीण सत्र शिबिर विभागांतर्गत आयोजित सात दिवसीय विशेष श्रमसंस्कार आणि ग्रामीण शिबिराचा समारोप बोथली येथे पार पडला. ‘Not Me But You’ हे ब्रीदवाक्य समोर ठेवून आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात विद्यार्थ्यांनी विविध सामाजिक उपक्रम राबवून गावकऱ्यांची मने जिंकली.

          निरोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी बोथलीचे सरपंच विनोद देठे होते. प्रमुख पाहुणे प्राध्यापक डॉ. शिवसिंग बघेल,डॉ गजानन नीलामे उपसरपंच देविदास नन्नावरे, माजी विद्यार्थी कपिल थुटे,प्राध्यापिका डॉ.प्रीती दवे प्राध्यापक डॉ. सुरेश मिलमिले इन्चार्ज बीएसडब्ल्यू ɪɪɪ & ɪᴠ , तसेच सर्व शिबिरार्थी व गावकरी उपस्थित होते. या कार्यक्रमा दरम्यान अध्यक्ष म्हणाले की शिबिर म्हणजे केवळ सात दिवसांचा उपक्रम नसून, तो विद्यार्थ्यांवर होणारा आयुष्यभराचा संस्कार आहे.

         ग्रामीण जीवनाचा अनुभव घेतल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकीची भावना अधिक दृढ होते.”या सात दिवशीय शिबिराच्या कालावधीत श्रमदान, आरोग्य शिबिर ,जनजागृती, बौद्धिक सत्र, सांस्कृतिक कार्यक्रम, योग व प्राणायाम वंदनीय राष्ट्रसंतांचे ग्राम उभारणीत युवकांचे योगदान महिला सक्षमीकरण लोकसहभागी मूल्यावलोकन तंत्र ,AIDS जागृती इत्यादी कार्यक्रम घेण्यात आले.

           निरोप समारंभावेळी कुमारी रिया रॉय ,कुमारी कांचन निकोडे, कुमार अनुप भोंगाडे इत्यादी विद्यार्थ्यांनी आपले अनुभव व्यक्त केले.शिबिरात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्वयंसेवकांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

         कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक डॉ. सी. जे.खंगार यांनी केले, तर आभार प्रदर्शन कुमारी रुतुजा भजभुजे या शिबिरार्थींने मानले. या सोहळ्याकरिता ग्रामस्थ, युवक आणि महाविद्यालयातील प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.राष्ट्रगीताने या कार्यक्रमाचा शेवट झाला.