” म्हणजे थोडक्यात सारांश असा की, देशाच्या स्वातंत्र्य मिळविण्यासाठीच्या प्रयत्नापासून अर्थात 1885 च्या स्थापनेपासून ते 2014 पर्यंत काँग्रेस पक्षाने राजकीय स्वातंत्र्यासाठी आणि स्थिरतेसाठीच प्रयत्न केले ( RSS ने मात्र मनुस्मृती लागू करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. जे प्रयत्न त्यांचे आजही चालू आहेत). म्हणून RSS च्या तुलनेत काँग्रेसने देशसेवाच केली. खलीस्तानवादी अतिरेक्याना सुवर्णमंदिरातून बाहेर काढण्यासाठी सैन्य घुसवून ‘ ऑपरेशन ब्लु स्टार ‘ घडवून आणून देशाची एकता व एकात्मता त्यांनी जपली.
बांगलादेशाच्या स्वातंत्र्यासाठी पाकिस्तानशी युद्ध करून बांगलादेशावर ताबा मिळविता आला असता, परंतू , तसे न करता त्यांनी त्या ही देशाचे सार्वभौमत्व जपले. 1974 मध्ये देशाला शांतता प्रस्थापित करण्यासाठी ‘ आणि बुद्ध हसला ‘ हे ब्रीद घेऊन भारताची पहिली अणूचाचणी अमेरिकेला न घाबरता यशस्वी करून दाखविली. बेघरांना घर, भूमिहीनांना जमीन देण्याची योजना राबवून इंदिरा गांधी यांनी आपल्या अवघ्या 20 वर्षाच्या कार्यकाळात जगात देशाचे स्वाभिमान, स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व कायम जपले. त्यासाठी इंदिरा गांधी आणि राजीव गांधीं यांनी प्रसंगी बलिदान देऊन त्यांनी त्यांची राष्ट्रभक्ती सिद्ध केली.
परंतू तरी सुद्धा त्यांनी 100% संविधानावर देश चालवीला नाही. जर चालवीला असता तर ही RSS कधीच नामशेष झाली असती…..!
गेल्या शंभर वर्षाचा थोडक्यात देशाचा इतिहास हा ठळकपणे असा की काँग्रेस व इतर राजकीय पक्षांनी राजकीय स्वातंत्र्यासाठी आणि सत्तेसाठीच देशाचा वापर केला. RSS वाल्यांनी मनुस्मृती लादण्यासाठीच प्रयत्न केला आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मात्र सामाजिक स्वातंत्र्यासाठीच प्रयत्न केले, शेवटी RSS च्या नाकावर टीच्चून *भारताच्या संविधानाची* निर्मिती करूनच थांबले ( तीला टिकविण्याची जबाबदारी आमच्यावर म्हणजे आम्ही भारताच्या लोकावर सोडून गेले).
परंतू , आर्य लोकांनी मात्र या देशात पाऊणेचार हजार वर्षांपासून राजकीय व कुसांस्कृतिक आक्रमण केल्यापासून ते आजपर्यंत म्हणजे 2026 पर्यंत कधी वैदिक म्हणून, कधी ब्राम्हण म्हणून, कधी हिंदूत्वाची कातडी पांघरून आणि आता RSS म्हणून यांनी देशात ‘ निसर्गनियमांविरोधी आणि मानवतवादाविरोधी ‘ असलेल्या मनुस्मृती वरच देश चालवीण्याच्या अट्टाहासापोटी 3% टक्के वाल्यांनी 97% टक्क्याना आपले गुलाम बनवून पुन्हा एकविसाव्या शतकात देशाला गुलाम बनविण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यांच्या शंभरीत त्यांना हे यश गाठायचे असल्याने लोकशाहीतुन ठोकशाही निर्माण करण्याचे 100% प्रयत्न चालविले जात आहेत. त्याला बहुजन समाज तेवढाच बळी सुद्धा पडल्या जात आहे. हे वास्तव नाकारता येत नाही.


