Home शैक्षणिक इंग्लिश ऑलिम्पियाड परीक्षेत नवजीवन कॉन्व्हेन्ट (साकोली) चे उल्लेखनीय यश…

इंग्लिश ऑलिम्पियाड परीक्षेत नवजीवन कॉन्व्हेन्ट (साकोली) चे उल्लेखनीय यश…

ऋग्वेद येवले 

   उपसंपादक 

         साकोली नवजीवन कॉन्व्हेन्ट अँड इंग्लिश प्रायमरी स्कूल, (सीबीएसई) जमनापूर/ साकोली येथील विद्यार्थ्यांनी इंग्लिश ऑलिम्पियाड परीक्षेत घवघवीत यश संपादन करून शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे.

         या स्पर्धेत यशस्वी ठरलेले विद्यार्थी पुढीलप्रमाणे – इयत्ता १ली: अमेया पर्बते, देवांश संग्रामे, राजवीर वाघमोडे इयत्ता २री: दिया राऊत, श्रावी पर्वते, रिहान डोंगरे इयत्ता ३री: संस्कृती गहाणे, आदिप्त नेवारे, रेवांत तालते, सारांश गुप्ता इयत्ता ४ थी: दक्षित हरिणखेडे, स्पर्श शहारे, यक्षित बोपचे इयत्ता ६ वी: सिद्धी पवार इयत्ता ७ वी: श्री लांजेवार इयत्ता ८ वी: कृत्तिका गहाणे विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुण मिळवून प्रमाणपत्रे व सन्मानचिन्हे प्राप्त केली. त्यांच्या या यशामुळे पालक, शिक्षक व शाळा व्यवस्थापनामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

          या यशाबद्दल शाळेचे व्यवस्थापक विनोद किरपान, प्राचार्या भारती व्यास, प्रशासकीय अधिकारी सतीश गोटेफोडे व पर्यवेक्षिका वंदना घोडीचोर यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

          विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल परिसरातून सर्वत्र कौतुक होत आहे.