Home Maharashtra वंचितचे चंद्रपूर शहराध्यक्ष स्नेहल रामटेके पदमुक्त… — चंद्रपूर महानगरपालिकेत भाजपचा उमेदवार महापौरपदी...

वंचितचे चंद्रपूर शहराध्यक्ष स्नेहल रामटेके पदमुक्त… — चंद्रपूर महानगरपालिकेत भाजपचा उमेदवार महापौरपदी विजय झाल्याने,पक्ष प्रमुख अँड.प्रकाश आंबेडकरांनी केली पक्षातून हकालपट्टी…

दिक्षा कऱ्हाडे 

 वृत्त संपादिका 

         चंद्रपूर महानगरपालिका महापौर निवडणुकीत भाजपच्या झालेल्या अनपेक्षित विजयानंतर वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष स्नेहल रामटेके यांना पदमुक्त करण्यात आले व त्यांनी नियुक्त केलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांना सध्या स्थगिती देण्यात आली आहे.

        वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष स्नेहल रामटेके यांची हकालपट्टी करण्यात आली तसेच त्यांनी केलेल्या सर्व नियुक्तींना देखील स्थगिती देण्यात आली आहे.

           चंद्रपूर शहराध्यक्ष स्नेहल रामटेके यांच्या अयोग्य व चुकीच्या नियोजनमुळे भाजपाचा महापौर चंद्रपूर महानगरपालिकामध्ये विजय झाल्याने पक्षशिस्तिचा व पक्ष भुमिकेचा चुकीचा संदेश अख्या महाराष्ट्रात गेला.

           यामुळे त्यांना तात्काळ पदमुक्त करण्यात आले.मात्र चंद्रपूर महापौर निवडणुकी संबंधाने स्नेहल रामटेके यांनी वरिष्ठ पक्ष पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली तर का केली व केली नसेल तर का म्हणून केली नाही काय?