Home Maharashtra आमदार रामदास मसराम यांचे अचानक भेटीत आढळून आले अंगारा प्राथमीक आरोग्य पथक...

आमदार रामदास मसराम यांचे अचानक भेटीत आढळून आले अंगारा प्राथमीक आरोग्य पथक कुलुप बंद… — आरोग्य यंत्रणेवर संताप,अंगारा प्राथमिक आरोग्य पथकावर कारवाईची मागणी…

    राकेश चव्हाण

तालुका प्रतिनिधी कुरखेडा

     कुरखेडा तालुक्यातील अंगारा येथील प्राथमिक आरोग्य पथकाच्या कामकाजाबाबत नागरिकांकडून वारंवार तक्रारी येत असल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार रामदास मसराम यांनी अचानक भेट देत परिस्थितीची पाहणी केली. 

     या भेटीदरम्यान आरोग्य केंद्र कुलुप बंद आढळले.आरोग्य पथकातील निष्काळजीपणा उघड झाल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.अंगारा हे आदिवासी व दुर्गम क्षेत्र असून येथे आरोग्य सेवा अत्यंत महत्त्वाची आहे. 

       मात्र,प्रत्यक्ष पाहणीवेळी डॉक्टर व कर्मचारी अनुपस्थित असल्याचे आढळले.तसेच रुग्णांना योग्य वेळी उपचार मिळत नसल्याच्या तक्रारी स्थानिक नागरिकांनी आमदारांकडे मांडल्या. 

      तत्काळ त्यांनी तालुका आरोग्य अधिकारी गहाणे यांना जाब विचारला,परंतु समाधान कारक उत्तर प्राप्त न झाल्यामुळे त्यानी नाराजी व्यक्त करित जिल्हा मुख्य कार्यपालन अधिकारी यांचेकडे तक्रार नोंदवीत संबंधित आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांचे वर कार्यवाही करण्याच्या सुचना दिल्या. 

      अशा प्रकारची हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही,असा इशारा आमदार रामदास मसराम यांनी दिला.तसेच जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी जिल्हा प्रशासनाकडे केली.

      ग्रामीण व दुर्गम भागातील प्रसूती पुर्व महिलांना नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळणे हा त्यांचा हक्क असून,अशा सेवेत कोणतीही त्रुटी सहन केली जाणार नाही,असेही त्यांनी स्पष्ट केले.

       या पाहणीदरम्यान दिलीप घोडाम,सामजिक कार्यकर्ते धनपाल मिसार,स्थानिक पदाधिकारी,सामाजिक कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.