Home Maharashtra चिमूर तालुक्यात जनगणनेची प्रक्रिया सुरु :- तहसीलदार श्रिधर राजमाने….

चिमूर तालुक्यात जनगणनेची प्रक्रिया सुरु :- तहसीलदार श्रिधर राजमाने….

शुभम गजभिये

  विशेष प्रतिनिधी

    केंद्र शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या जनगणनेअंतर्गत चिमूर तालुक्यात जनगणना प्रक्रियेला सुरुवात झालो आहे.तहसील कार्यालय चिमूर जाहीर सूचनेद्वारे नागरिकांना याबाबत माहिती देत स्वगणना करण्याचे आवाहन केले.

       जनगणनेच्या पहिल्या टप्प्यातील घरगणना 16 मे ते 14 जून या कालावधीत पार पडणार आहे.यासाठी प्रगणक व पर्यवेक्षक घरभेटी देणार आहेत.

      मात्र,त्याआधी मे ते 15 मे या कालावधीत नागरिकांना https://se.census.gov.in/ या संकेत स्थळावर ऑनलाइन स्वगणना करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलो आहे.स्वगणना सुविधेमुळे नागरिकांना स्वतःहून अचूक माहिती भरता येणार असून वेळेची बचत होणार आहे.

          तसेच माहितीतील त्रुटी कमी होऊन शासनाला विकास आराखड्‌यासाठी विश्वासार्ह माहिती उपलब्ध होईल,असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला.

         जनगणना कायदा 1948 नुसार प्रत्येक कुटुंब व प्रमुख यांना माहिती देणे बंधनकारक असून नागरिकांनी अचूक माहिती देणे आवश्यक आहे.

         दिलेली माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवली जाणार असून तिचा वापर कोणत्याहो कर किंवा इतर चौकशीसाठी केला जाणार नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे.

SE ID प्रगणकास दाखवणे आवश्यक राहणार….

         नागरिकांनी 1 मे ते 15 मे स्वगणनेसाठी अधिकृत संकेतस्थळ किंवा संबंधित पोर्टलला भेट देऊन मोबाइल क्रमांकाद्वारे नोंदणी करावी. त्यानंतर कुटुंबातील सदस्यांची माहिती भरून फॉर्म सबमिट केल्यानंतर 16 अंको आयडी प्राप्त होणार आहे.हा आयडी प्रगणकास दाखवणे आवश्यक राहणार आहे.

         ऑनलाइन प्रक्रिया करता न आल्यास सीएससी.आपले सरकार सेवा केंद्र,ग्रामपंचायत किंवा इंटरनेट सेंटरच्या माध्यमातूनही स्वगणना करता येणार आहे.

         तरी जास्तीत जास्त नागरिकांनी आपली स्वगणना करण्याचे आवाहन,श्रीधर राजमाने,चार्ज अधिकारी तथा तहसिलदार,चिमूर यांनी केले आहे.