Home Social ग्रामगीता महाविद्यालय चिमूरचे रासेयो शिबिर संपन्न…

ग्रामगीता महाविद्यालय चिमूरचे रासेयो शिबिर संपन्न…

शुभम गजभिये

विशेष प्रतिनिधी…

चिमूर :- 

     सेमाना विद्या व वनविकास प्रशिक्षण मंडळ,गडचिरोली द्वारा संचालित ग्रामगीता महाविद्यालय,चिमूर येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने मौजा मालेवाडा येथे आयोजित सात दिवसीय रासेयो शिबिराची सांगता नुकतीच उत्साहात पार पडली.

           महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.सुनंदा एस.आस्वले यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर यशस्वीरीत्या पार पडले.समारोपीय कार्यक्रमाला माझी प्राचार्य डॉ.अमीर धमानी आणि व्हॉइस ऑफ मीडिया चंद्रपूर,सरचिटणीस श्री श्रीहरी सातपुते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

           त्यांनी शिबिरार्थींना मार्गदर्शन करताना रासेयो शिबिरासाठी निवड झालेल्या स्वयंसेवकांना भाग्यशाली संबोधले.रासेयो शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मनावर जे संस्कार होतात,ते आयुष्याच्या जडणघडणीसाठी अत्यंत उपयुक्त ठरतात.तसेच शिबिरामुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात सकारात्मक बदल झाल्याचे स्पष्टपणे दिसून येते,असे मत त्यांनी व्यक्त केले.

                या समारोपीय कार्यक्रमास मालेवाडा ग्रामपंचायतीचे सरपंच श्री. कालिदासजी भोयर,उपसरपंच श्री.शंकर दडमल,मुख्याध्यापक श्री.गुलाब पंधरे,तंटामुक्ती समिती अध्यक्ष श्री.प्रवीण जीवतोडे,शा.व्य.स.चे अध्यक्ष श्री.आशिक रामटेके, गु.से.मं.चे श्री.चरणदास पोइनकर,ग्रामसेवक श्री.राजेश कांबळे,पोलीस पाटील श्री. हेमंत गजभिये आदी मान्यवर उपस्थित होते.उपस्थित सर्व मान्यवरांनी शिबिरार्थींना शुभेच्छा दिल्या.

         कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.डॉ.हूमेश्वर आनंदे होते.अध्यक्षीय भाषणात त्यांनी समाजाचे ऋण परतफेड करण्याचा एक प्रभावी मार्ग म्हणजे रासेयो शिबिर असून प्रत्येक भारतीयाचे समाजाविषयी दायित्व आहे,याची जाणीव विद्यार्थ्यांना या शिबिरातून झाल्याचे नमूद केले.देशप्रेमाची भावना स्वयंसेवकांमध्ये निर्माण होणे हेच या रासेयो शिबिराचे फलित असल्याचे त्यांनी सांगितले.

           समारोपीय कार्यक्रमात रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ.बिजनकुमार शिल यांनी सात दिवसीय शिबिराचा सविस्तर अहवाल सादर केला.या समारोपीय कार्यक्रमात राष्ट्रीय सेवा योजनेचे ‘माझ्यासाठी नाही तर तुमच्यासाठी’ या वृद् वाक्याला सार्थक करणारे गावातील तीन व्यक्तिमत्त्व,श्री.कालिदासजी भोयर,श्री.आशिक रामटेके आणि श्री.चरणदासी पोइनकर यांना महाविद्यालयाच्या वतीने शॉल आणि श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

           मालेवाडा येथे पार पडलेल्या या रासेयो शिबिरात प्राणायाम,ध्यान व योगासने,ग्राम स्वच्छता,जलसंवर्धन रॅली,रक्तदान शिबिर,आपत्ती पूर्वतयारी व व्यवस्थापन,व्यक्तिमत्त्व विकास,पशुचिकित्सा शिबिर,मानव–वन्यजीव संघर्ष,स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन,आरोग्य शिबिर,संविधान सन्मान रॅली,सकारात्मक दृष्टिकोन व मानवी विकास,सामुदायिक प्रार्थना तसेच विविध सांस्कृतिक व बौद्धिक कार्यक्रम राबविण्यात आले.

      ज्ञसमारोपीय कार्यक्रमाचे प्रास्ताविक रा.से.यो.स्वयंसेविका कु.संगीता चौधरी,सूत्रसंचालन रा.से.यो.स्वयंसेविका कु.प्राची मंगर,तर आभार प्रदर्शन रा.से.यो.स्वयंसेविका कु. अश्लेषा चन्ने यांनी केले.

          कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापकवर्ग,प्रशासकीय कर्मचारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.