शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
चिमूर :-
दिनांक ०८ फेब्रुवारी २०२६ रोजी श्री.संताजी तेली समाज बहुउद्देशीय मंडळ,खडसंगी यांच्या वतीने आयोजित श्री.संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी महोत्सव,समाजप्रबोधन व मार्गदर्शन सोहळा मोठ्या उत्साहात व भक्तिभावाच्या वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री.परसराम नागोसे हे होते तर सत्कारमूर्ती म्हणून चिमूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. बंटीभाऊ भांगडीया हे होते.
विशेष अतिथी म्हणून प्राचार्य विठ्ठलराव निकुरे,चिमूर तहसीलचे नायब तहसीलदार श्री.डी.के.निकुरे,खडसंगी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. प्रियंकाताई कोलते,शंकरपूर ग्राम पंचायतचे उपसरपंच श्री.अशोक ज्ञानेश्वर चौधरी यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
या प्रसंगी मार्गदर्शन करताना आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी सांगितले की,संत जगनाडे महाराजांचे विचार समाजासाठी प्रेरणादायी असून त्यांच्या विचारांप्रमाणे संघटित समाज घडविणे आवश्यक आहे.
समाजाच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या कोणत्याही कामात निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही असेही आमदार म्हणाले.
तसेच
कार्यक्रमात बोलताना श्री. अशोक ज्ञानेश्वर चौधरी (अध्यक्ष, श्री संताजी तेली समाज मंडळ,शंकरपूर तथा उपसरपंच, ग्रामपंचायत शंकरपूर) यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज,भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर,छत्रपती शिवाजी महाराज व संत जगनाडे महाराज यांच्या विचारांचा गौरव करत शिक्षण,संघटन व सदाचार यांचे महत्त्व अधोरेखित केले.युवकांनी व्यसनांपासून दूर राहून शिक्षण व राष्ट्रसेवेकडे वळावे,समाजप्रबोधन ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमास श्री.मोहन सातपैसे,श्री.बंडूजी तराळे,सौ. प्रेमिलाताई भजभुजे,सौ. सोनालीताई तराळे,श्री.अनिल भजभुजे,श्री.अजय आकडे,श्री.रवींद्र राखडे तसेच खडसंगी परिसरातील मोठ्या संख्येने समाजबांधव,माता-भगिनी व युवक उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी श्री संताजी तेली समाज बहुउद्देशीय मंडळ, खडसंगी यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले.
कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता मंडळाचे अध्यक्ष श्री.सतीशजी देव्हारे,श्री.विनोदजी नागोसे,श्री.मदनजी तराळे,श्री. रवींद्रजी कोलते,श्री.विलासजी तराळे, व सर्व समाज बांधवांनी अथक परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचा समारोप “जय संत जगनाडे महाराज” या घोषणांनी उत्साहात करण्यात आला.



