Home Maharashtra चिमूर तालुक्यातील दारु,सट्टा,जुगार,या अवैध व्यवसायाला आशिर्वाद कुणाचा?… — अनेक नागरिकात दारिद्र्याची...

चिमूर तालुक्यातील दारु,सट्टा,जुगार,या अवैध व्यवसायाला आशिर्वाद कुणाचा?… — अनेक नागरिकात दारिद्र्याची भर घालून त्यांना बरबाद करायचे आहे काय?

 लक्षवेधी

प्रदीप रामटेके

  मुख्य संपादक

           चिमूर तालुक्यातील प्रत्येक महसूल मंडळ व पोलीस बिट कार्यक्षेत्रात अवैध देशी विदेशी दारुसह सट्ट्याचा व्यवसाय जोमाने सुरु आहे.तद्वतच चिमूर,भिसी,शंकरपूर परिसरात येथे जुगारांची अड्डे सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.या अवैध व्यवसायाला कुणाचा आशिर्वाद आहे? हे पोलिस विभागाच्या अधिकाऱ्यांनी व बिट जमादार,बिट शिपाई यांनी शोधून काढले पाहिजे,हेच चिमूर तालुक्यातील जनतेला अपेक्षित आहे.

           सट्टा,गावठी,देशी विदेशी दारुच्या अवैध व्यवसायाला चिमूर तालुकातंर्गत ग्रामीण भागात मोकळीकता आहे असेच सध्याचे चित्र आहे.याचबरोबर शहरी भागात सट्टा व्यवसायाला खुली सुट आहे.अवैध व्यवसायाला संधी व मोकळीकता कुणी दिली हे सुद्धा चिमूर तालुक्यातील नागरिकांना कळायला पाहिजे आणि हा त्यांचा अधिकार आहे.

            तद्वतच दारु व सट्या सारख्या अवैध व्यवसायाला प्रोत्साहन आणि पाठबळ देणारे कोण आहेत,त्यांचे अवैध व्यवसायासी संबंध आहेत काय?याकडे सुध्दा पोलिस विभागाची नजर गेली पाहिजे.

           दारु व सट्ट्या सारख्या अवैध व्यवसायाला अनुसरून सामान्य नागरिकांची आर्थिक घडी विस्कटत असल्यामुळे त्यांना अनेक समस्या व संकटांचा सामना करावा लागतो आहे.

            या दोन्ही व्यवसायामुळे अनेकांच्या संसाराची आर्थिक घडी विस्कटली असून त्यांच्या घरातील मुले-मुली महत्त्वपुर्ण शिक्षणापासून दूर राहतात,त्यांना आवश्यक मुलभूत सुविधा मिळवता येत नाही,त्यांना मुलभूत जिवनावश्यक वस्तू मिळत नाही,हा प्रकार एक राष्ट्रीय संकटाचा व राष्ट्रीय दारिद्र्याचा भाग आहे हे लक्षात घेतले पाहिजे.

         दारु व सट्टा हे राजरोसपणे वाढणारे अवैध व्यवसाय हे स्थानीक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे वाढत असले तरी या अवैध व्यवसायाला त्यांचाच दुर्लक्षितपणा चालना देतो हे नाकारता येत नाही.

            याचबरोबर अवैध व्यवसायाला चालना देण्यासाठी कुण्या राजकीय बडव्यांचा हात असेल तर तो हात पोलिस विभागाच्या अधिकाऱ्यांनी कायदेशीर छाटला पाहिजे आणि हा त्यांचा कर्तव्य अधिकार आहे.

            परंतु या अवैध व्यवसायाला प्रोत्साहन व चालना देण्यासाठी पोलिस विभागाच्या अधिकाऱ्यांचा गुपचूप राहणे हा कार्यभाग स्थानिक नागरिकांना दिसून येत असेल तर ते स्वत:च्या पद व गोपनीयतेची खिल्ली उडवतात आणि त्यांच्या ब्रिद वाक्याची थट्टा करतात असे म्हणावे का?

            अवैध व्यवसायाला अनुसरून त्यांच्या कार्यक्षेत्रातंर्गत नागरिकांच्या संरक्षणाला पोलिस विभाग महत्त्व देत नसेल तर,ती गंभीर बाब!

क्रमशा…