Home Maharashtra आमदार रामदास मसराम यांच्या प्रयत्नांना यश कोरची येथे नवीन विश्रामगृहास २.५७ कोटींचा...

आमदार रामदास मसराम यांच्या प्रयत्नांना यश कोरची येथे नवीन विश्रामगृहास २.५७ कोटींचा निधी मंजूर….

राजेंद्र रामटेके 

 विशेष प्रतिनिधी 

            कोरची तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार रामदास मसराम सातत्याने पाठपुरावा करत असून त्यांच्या ठोस प्रयत्नांना मोठे यश मिळाले आहे. कोरची येथे अत्याधुनिक सोयीसुविधांनी सुसज्ज अशा नवीन शासकीय विश्रामगृहाच्या बांधकामासाठी २ कोटी ५७ लाख रुपयांचा निधी शासनाने मंजूर केला आहे.

           कोरची तालुका हा आदिवासी व दुर्गम भागात येत असल्याने प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच विविध विभागांचे कर्मचारी यांना वास्तव्याच्या सुविधांचा अभाव जाणवत होता. ही बाब लक्षात घेऊन आमदार रामदास मसराम यांनी सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांमुळेच हा महत्त्वाचा विकासात्मक प्रस्ताव मंजूर झाला आहे.

          या विश्रामगृहामुळे तालुक्यातील प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान होणार असून नागरिकांच्या प्रश्नांना वेळेत न्याय मिळण्यास मदत होणार आहे. तसेच बाहेरून येणाऱ्या अधिकाऱ्यांना सोयीस्कर व्यवस्था उपलब्ध होणार असल्याने कोरची तालुक्याच्या विकासाला नवी चालना मिळणार आहे.

            या निधी मंजुरीबद्दल कोरची तालुक्यातील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते व विविध संघटनांनी आमदार रामदास मसराम यांचे अभिनंदन करून आभार व्यक्त केले आहेत. विकासासाठी कटिबद्ध असलेले आमदार रामदास मसराम यांचे नेतृत्व कोरची तालुक्यासाठी निश्चितच लाभदायक ठरत असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.