माणूस रानटी अवस्थेत होता,त्याची बुद्धी परिपक्व झालेली नव्हती,म्हणून तो हिंस्र जनावरासारखे वर्तन करीत होता,आपल्या स्वार्थासाठी इतरांचे जीव पण घेत होता,
कालांतराने त्याची अविकसित बुद्धी विकसित झाली,बुद्धी जशी जशी विकसित होत गेली,तसतसे त्याच्या वर्तनात बदल होत गेला.त्याचा विवेक जागा होत गेला,अखिल मानव जातीचे हित एकमेकाची हिंसा करण्यात नसून,एकमेकांचे शोषण करण्यात नसून,एकमेकावर अन्याय अत्याचार करण्यात नसून सहकार्य ,बंधुभाव, अहिंसा,सलोखा,तडजोड,प्रेम,दया ,क्षमा,शांती,न्याय ,नीती,सत्य या गोष्टीतच आहे,हे जेंव्हा आणि हे जसजसे माणसाला उमजत गेले,तसतसे त्यातील रानटीपण कमी होत गेले.माणसाने माणसाशी माणसासारखे वागले पाहिजे,यातच मानव कल्याण आहे,याबद्दल बहुतांशी लोकांना वाटायला लागले.शिवाय असे शिक्षण माणसातीलच काही दृष्टे व्यक्तींनी दिले,मानवतेचे प्रबोधन केले.म्हणून प्रेमाचे ,बंधुभावाचे स्वातंत्र्याचे,सलोखा,समजदारीचे शिक्षण आणि संस्कार देण्यासाठी म्हणून औपचारिक ” धर्म ” नावाने काही संस्था निर्माण झाल्या.
मुळात प्रत्येक धर्माचे तत्व आणि विचार हे स्वातंत्र्य बंधुत्व समता न्याय प्रेम दया क्षमा शांती अहिंसा हेच आहेत.ही तत्वे म्हणजेच धर्म होय,अशी सर्व मानवजातीने मान्य केले. तरी पण ज्या धर्मात ही तत्वे पाळल्या गेली नाहीत,म्हणजेच ज्या धर्मात आधार्माचे प्रमाण वाढले.माणुसकीची वागणूक मिळणे कठीण झाले,अशा धर्माचा त्याग करून नवा धर्म स्थापन करण्यात आले.तसेच विविध धर्मांची तत्वे आणि संस्कृती अलग अलग असल्याने अनेक धर्म स्थापन झाले.तरीही कोणत्याही धर्मात हिंसा नाही.प्रेमच आहे.माणसापासून माणूस तोडणे नसून जोडण्याचेचं प्रत्येक धर्माचे धोरण विचार आहे.परंतु धर्माचा उपयोग सत्तेसाठी राजकारणासाठी होऊ लागला,तेंव्हा धर्म हा अधर्म बनला.पारंपरिक धर्म बदनाम व्हायला लागले.शिवाय धर्मात आणि धर्मग्रंथात अनेक अंधश्रद्धा घुसल्या,पोथी पुराणात अंधश्रद्धा चे लेखन करण्यात आले.स्वातंत्र्यावर समतेवर बंदी आणल्या गेली.यामुळे मानवजातीसाठी उपकारक असलेले धर्म हे अपकारक झाले.माणसांच्या जीवावर उठले.जाती धर्माच्या देवाच्या नावाने हिंसाचार सुरू झाला.21 व्या शतकात तर हे प्रमाण अधिकच वाढले.आता माणसांचे लोकांचे राज्य असे न राहता धर्माचे राज्य,धर्माचे साम्राज्य,त्यातून जिहाद,धार्मिक अतिरेकीपणा,धर्मांधता,धर्माची सत्ता आणि जगात ” आपल्याच धर्माचे राज्य असावे,इतर धर्म या पृथ्वीवरून नष्ट झाले पाहिजेत,इतक्या संकुचित आणि भयानक विचारापर्यंत सारे देश येऊन ठेपले आहेत.आता आर्थिक विषमता आणि समता ,समाजवाद या विषयावरची भांडणे कमी झालेत,आणि जगात धार्मिक युद्धे होताना दिसतात.सैन्याचा उपयोग देशाच्या सीमा,देशातील जनतेच्या जीविताची आणि मालमत्तेची सुरक्षितता यासाठी नसून धर्माच्या संरक्षणासाठी ,धर्माचे राज्य स्थापन करण्यासाठी सैन्याचा उपयोग होताना दिसत आहे.ही फारच शोचनीय आणि गंभीर बाब आहे.खरे तर धर्म म्हणजे सहिष्णुता,सहकार्य,एकमेकांच्या जीविताची काळजी घेणे,एकमेकांबद्दल माया ममता प्रेम अशी धर्माची व्याख्या आहे,परंतु जगातील स्वार्थी लोक सत्तेचा गैरवापर करताहेत.सत्ता मिळवण्यासाठी आणि टिकविण्यासाठी धर्माचा गैर अर्थ लाऊन गैर फायदा घेताहेत.जनतेला देवाच्या धर्माच्या नादी लाऊन,त्यांना धर्मांध ,जात्यांध, देव अंध भक्त बनवून दोन धर्मात भांडणे लाऊन हे राजकीय लोक आपली पोळी भाजून घेत आहेत.बिचारी गरीब,लाचार, धर्म भोळी,देवभोळी जनता यांच्या विचाराला प्रचाराला बळी पडत आहे,हे जगाचे चित्र तर आहेच,पण भारताचे तर भयानक विचित्र आहे.धर्माच्या नावाखाली सर्वांचे जीव जाण्याची वेळ आली आहे.धर्मयुद्ध पेटले आहे.हे युद्ध जेंव्हा उग्र रूप घेईल,तेंव्हा केवळ मुस्लिम ख्रिश्चनच नव्हे तर हिंदू सुद्धा यात होरपळून मारणार आहेत.याचा अर्थ हिंदू राष्ट्र करण्याच्या भानगडीत हिंदुराष्ट्राच्या होळीत आपण पण भस्म होणारा आहोत,हे राजकारणी लोकांना कळले पाहिजे.स्वार्थांध एव्हढे पण होऊ नये,की मृत्यू जवळ आल्याचे दिसू नये ?
धर्म कोणताही असो,धर्माची व्याख्या केली तर स्वातंत्र्य म्हणजेच धर्म आणि पारतंत्र्य म्हणजेच गुलामी होय.हुकुमशाही म्हणजेच अधर्म होय. जो धर्म माणसाला आपला विकास करून घेण्याचे स्वातंत्र्य देत नाही,जो धर्म माणसामाणसात भेद करतो,समता मानत नाही,जो धर्म विषमतेचा पुरस्कार करतो आणि समतेचा तिरस्कार करतो,ज्या धर्मात हुकुमशाही आहे,आणि हुकूमशाहीला मान्यता देतो, तो धर्म नसून अधर्म होय,जो धर्म स्त्री पुरुष भेदभाव करतो,जातीभेद, वंशभेद करतो,घराणेशाहीस मान्यता देतो,हुकुमशाहीस मान्यता देतो,ज्या धर्मात स्वातंत्र्य नाही,समता नाही,बंधुभाव नाही,न्याय नाही,असा धर्म म्हणजे धर्म नसून अधर्म होय.असा धर्म माणसाचा नसून जनावराचा तो धर्म होय.माणसाने माणसाबरोबर माणसासारख वागणे,आपल्यामुळे इतरास यत्किंचितही दुःख दर्द होणार नाही,याची काळजी घेणे म्हणजेच धर्म होय,मानवता होय.मानवता धर्म हाच खरा सत्य धर्म होय,अन्यथा खोटा असत्य धर्म होय.
आज मितीस जे अनेक पारंपरिक धर्म आहेत,त्यात किती स्वातंत्र्य आहे ? आणि धर्मातील जातींना ,स्त्रियांना,आर्थिक वर्गाना किती स्वातंत्र्य आहे ? याचे उत्तर शोधले तर कुण्या धर्माची कुणावर किती हुकुमशाही आहे हे कळेल.



