बाळासाहेब सुतार
निरा नरसिंहपुर प्रतिनिधी
2026 च्या पंचायत समिती पंचवार्षिक निवडणूकीसाठी लुमेवाडी गणात पंचायत समितीचे उमेदवार शिवाजी (दादा पाटील) मोहिते यांच्या प्रचाराला मतदार संघातून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, संचालक आप्पासाहेब जगदाळे, यांचे हात बळकट करण्यासाठी व राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी मतदान रुपी घड्याळ या चिन्हावर मतदान करून आशीर्वाद द्या.
इंदापूर तालुक्याच्या काना कोपऱ्यात घड्याळाला साथ मिळत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. गावोगावी भेटी, संवाद आणि विकासा भिमुख यामुळे नागरिकांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून, मतदारांमध्ये उत्साह दिसून येत आहे. लुमेवाडी गणात परिवर्तन होणारच असल्याचे दिसू लागले आहे.
उमेदवार शिवाजी (दादा पाटील) मोहिते यांना मतदारांचा भरभरून प्रतिसाद मिळत असल्याने परिसरात वातावरण चांगलेच निर्माण झालेले आहे. नरसिंहपुर, टणु , गिरवी, पिंपरी बुद्रुक, गणेशवाडी, ओझरे, गोंदी, लुमेवाडी, सराटी, चाकाटी, आधी सर्व भागातील मतदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला साथ देऊन घड्याळाच्या चिन्हावर मतदान करून जास्तीत जास्त मतांनी शिवाजी (दादा पाटील) मोहिते यांनाच विजय करणार असल्याचे बोलत आहेत. जसजशी मतदान तारीख जवळ येईल, तस तशे मतदार व कार्यकर्त्याचा पाठिंबा मिळत आहे.



