Home Political इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला साथ देऊन कृषिमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांचे...

इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला साथ देऊन कृषिमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांचे हात बळकट करा:-उमेदवार शिवाजी मोहिते (दादा पाटील) यांचे मतदारांना आव्हान… — इंदापूर पंचायत समितीचे उमेदवार शिवाजी मोहिते टणु यांचा मतदार संघात होम टू होम प्रचारावर भर ! तर मतदारांचा राष्ट्रवादी पक्षाला चांगलाच प्रतिसाद…

  बाळासाहेब सुतार

निरा नरसिंहपुर प्रतिनिधी…

           इंदापूर तालुका पंचायत समिती 2026 निवडणुक लुमेवाडी गण या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार शिवाजी विजयसिंह मोहिते-पाटील यांचा प्रत्येक गावोगावी होम टू होम प्रचार दौरा चालू आहे.

         शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत दौरा चालू असताना प्रत्येक गावोगावी मतदारांचा राष्ट्रवादीसाठी काँग्रेस पक्षाकडे चांगलाच प्रतिसाद पाहावयास मिळत आहे.महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करून लुमेवाडी गण या ठिकाणी शिवाजी मोहिते यांनी कार्यकर्त्यांन समवेत होम टू होम प्रचारावर भर दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शिवाजी मोहिते यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे.

             दोन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एकी आणि कृषिमंत्री दत्तात्रय भरणे व माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील,जिल्हा बँक संचालक आप्पासाहेब जगदाळे, तालुका अध्यक्ष हानुमंत कोकाटे,या सर्वांची सात आसल्यामुळे तालुक्यातील मतदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभा आसल्याचे पहावयास मिळाले आहे व प्रचंड मतदारांचा प्रतिसाद मिळत आहे.

         यावेळी त्यांनी नरसिंहपुर टणु, गिरवी, पिंपरी बुद्रुक, गोंदी, ओझरे, लुमेवाडी, सराटी, निरनिम गाव, भगतवाडी, आधी सर्वच गावात होम टू होम प्रचार करत मतदारांशी संवाद साधला आहे. लुमेवाडी गणातील उमेदवार शिवाजी मोहिते यांना विकासासाठी निवडून द्यावे असे आवाहन मतदारांना केले आहे. 

       उमेदवार शिवाजी मोहिते बोलत असताना म्हणाले की जनसेवेची संधी दिली आहे. आता मतदारांनी प्रचंड बहुमताने विजयी करावे असे आवाहन केले आहे.