Home क्रीडा जागतिक मानांकन कुस्ती स्पर्धेसाठी प्रा.दिनेश गुंड यांची निवड…

जागतिक मानांकन कुस्ती स्पर्धेसाठी प्रा.दिनेश गुंड यांची निवड…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक 

पुणे : जागतिक कुस्ती संघटनेच्या वतीने दि. २ ते ८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत क्रोएशिया (युरोप) येथे होणाऱ्या जागतिक मानांकन कुस्ती स्पर्धेसाठी प्रा.दिनेश गुंड यांची भारतीय कुस्ती संघाकडून तांत्रिक अधिकारी म्हणून निवड करण्यात आली आहे.

         आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करण्याची गुंड यांची ही ६७ वी आंतरराष्ट्रीय स्पर्धा ठरणार असून, आतापर्यंत त्यांनी राज्य व राष्ट्रीय स्तरावर २०० हून अधिक तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर ६७ स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. महाराष्ट्रातून इतक्या मोठ्या संख्येने आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणारे ते एकमेव तांत्रिक अधिकारी असल्याचे विशेष मानले जात आहे.

         या उल्लेखनीय निवडीबद्दल केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहळ, कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष रामदास तडस, सरचिटणीस योगेश दोडके, कार्याध्यक्ष संदीप आप्पा भोंडवे, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष मेघराज कटके, नवनाथ घुले व मारुती सातव यांनी प्रा.गुंड यांचे अभिनंदन केले. प्रा.दिनेश गुंड यांच्या या निवडीमुळे राज्यासह देशाच्या कुस्ती क्षेत्रातील मान उंचावला असून, नवोदित तांत्रिक अधिकाऱ्यांसाठी ते प्रेरणास्थान ठरत आहेत.