शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी..
चिमूर नगरपरिषदेच्या हद्दीत असलेल्या मौजा काग येथील स्मशानभूमी येथे सेड नाही आणि स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता नसल्याने सेड व रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी चिमूर नगराध्यक्ष गिताताई लिंगायत यांना रोखठोक प्रहार कामगार संघटना चिमूर तालुका अध्यक्ष आशिद अमरदिप मेश्राम यांनी निवेदन दिले.
मागील अनेक वर्षांपासून स्मशानभूमी येथे सेड बाधकामासाठी व स्मशानभुमीकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी आशिद अमरदिप मेश्राम यांनी लावून धरली आहे.
मात्र,त्यांच्या महत्त्वपूर्ण मागणीकडे नगरपरिषदेचे बांधकाम विभाग लक्ष देताना दिसत नाही.
यामुळे नगराध्यक्ष गिताताई लिंगायत यांनी विशेष लक्ष देत मौजा काग येथील स्मशानभूमी अंतर्गत दोन्ही समस्या निकाली काढव्यात अशी अपेक्षा आशिद अमरदिप मेश्राम यांना आहे.




